मुंबई, रात्री आठ ते नऊ तास झोपल्यानंतरही तुम्हाला दिवसा झोप (Sleep Disorder) येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. खरं तर, अन्न आणि पाण्याप्रमाणेच झोपही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मानवी शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी किमान सात तासांची झोप लागते. झोप न येण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो, तर अनेकांना खूप झोप येते. हे दोन्ही आरोग्यासाठी चांगल्या नाही. याचा थेट संबंध आपल्या ह्रदयाशी आहे. या सम्येमागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊया.
सतत झोप न लागण्याच्या समस्येला हायपरसोमनिया म्हणतात. या आजारात रात्री उशिरा झोपल्यानंतरही दिवसा जास्त झोप येते. त्यामुळे तुमचे दैनंदिन जीवन आणि कामावरही परिणाम होतो. अति मद्यपान, तणाव आणि नैराश्यामुळेही ही समस्या उद्भवते. या समस्येने त्रस्त असलेले लोक कधीकधी झोपेतून सुटका करण्यासाठी जास्त चहा-कॉफीचे सेवन करू लागतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला या समस्येवर मात करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत.
प्रत्येकाला किमान सात ते आठ तास झोपेची गरज असते. तुमची झोपेची पद्धत चांगली ठेवण्यासाठी एकाच वेळी झोपणे आणि जागे होणे आवश्यक नाही. झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल इतर गॅजेट्स बाजूला ठेवावे.
नियमितपणे पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी चांगली राहते. आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट्सचे चांगले संतुलन असले पाहिजे. सकस अन्नाचा शरीरावर साखर आणि कॅफीन सारखाच प्रभाव पडतो. त्यामुळे लक्षात ठेवा की, झोपण्यापूर्वी असे पदार्थ सेवन करने टाळावे ज्यामुळे तुमची झोप खराब होईल.
तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या. निर्जलीकरणामुळे तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते आणि तुम्हाला थकवा आणि सुस्त वाटू शकते. त्यामुळे हायड्रेटेड राहा.
व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासोबतच ते तणाव दूर करण्याचेही काम करते. सकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते.
तणाव तुमच्या झोपेचा शत्रू असू शकतो. तणावाचा सामना करण्यासाठी ध्यान करा. ध्यान केल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि तणाव दूर होण्यासही मदत होते.