मुंबई : आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.
जळजळ होणे
मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.
मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.
मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत
आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.
मसाल्याचे पदार्थ खायला चांगले लागतात पण त्यामुळे बहुतेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. जसे की जळजळ, अपचन, गॅस, पित्त आशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर आता आपण या समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत
मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.
मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.
प्रत्येकाने मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत