मुंबई : आजकाल प्रत्येकाला बाहेरचे पदार्थ खायला मोठ्या प्रमाणात आवडतात. त्यात फास्टफूड म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. त्यात कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी असो प्रत्येक जण फास्टफूडवर ताव मारताना दिसतं. त्यात आपला एखादा आवडता पदार्थ असेल तर तो आपण मनसोक्त खातो. पण काही वेळा आपण एखादा पदार्थ जास्त प्रमाणात खातो यामुळे आपले पोट जड होते, ऍसिडिटी होते, गॅस होतो. अशावेळी काय करायचे हे बहुतेक लोकांना सुचत नाही. तर आता आपण अशा तीन चहांबाबत जाणून घेणार आहोत जे पिल्यानंतर तुमच्या पोटाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
मध-लिंबू- आल्याचा चहा – जर बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमचे पोट जड झाले असेल किंवा पोटात गॅस झाला असेल तर अशावेळी तुम्ही मध लिंबू आणि आल्याचा चहा पिऊ शकता. कारण मध आणि लिंबू हे पोटाला आराम देते, तर आलं हे आपल्या पोटातील गॅस कमी करण्यास मदत करते. त्यामुळे या तीन गोष्टींचा मिश्रण असलेला हा चहा पोटासाठी खूपच उपयुक्त ठरतो.
तुळशीचा चहा – तुळशी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच पोटासाठी देखील तुळशी खूप उपयुक्त आहे. तर तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर तुळशीची पाने टाकलेला चहा तुम्ही प्या. यामुळे तुमचे पोट हलके होईल आणि गॅस एसिडिटी सारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
ओव्याचा चहा – ओवा हा पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे पोटातील विकार कमी करण्यास मदत करतात. तर जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस अपचन या समस्या असतील तर तुम्ही ओव्याचा चहा जरूर प्या. यामुळे तुमच्या पोटातील गॅस, एसिडिटी दूर होण्यास मदत होईल आणि तुमचे पोट हलके देखील होईल.