नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीचं वजन काही एका झटक्यात वाढत (weight gain) नाही. त्यामुळे ते लगेचच कमी होईल अशी (weight loss) अपेक्षा करणंही चुकीचच आहे ना ! त्यासाठी कोणतीही ठराविक डेडलाइन नसते. ही एक सतत चालणारी प्रोसेस (process) आहे. तुम्ही जितकी जास्त मेहनत (repeated efforts) कराल, तुम्हाला तेवढे उत्तम रिझल्ट्स दिसतील. पण वेट लॉसची प्रक्रिया योग्य प्रकारे पाळली गेली, फॉलो करण्यात आली तरच त्याचे फायदे दीर्घकाळ दिसून येतील. किरकोळ चुकांमुळे लोक आपले वजन कमी करू शकत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्या चुकांकडे दुर्लक्ष करणं खूप सोपं आहे, पण या चुका दीर्घकाळ सुरू राहिल्या तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.
जर तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि तुम्हाला मनाजोगत रिझल्ट मिळत नसेल तर आधी तुम्ही काही चूक तर करत नाहीये ना ते तपासा. काही कॉमन चुका असतात, ज्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्या कोणत्या हे समजून घेऊया.
खाणं बंद करू नका
जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे, ते सर्वात पहिले एकच नियमि फॉलो करतात- तो म्हणजे खाणं-पिणं बंद करणे. पण खाणं सोडल्याने कोणत्याच व्यक्तीला वजन कमी होण्यात बिलकूल मदत होत नाही. कमी खाल्ल्याने वजन कमी होत असले तरी ते कमी कालावधीसाठी, तात्पुरते असते. नीट न जेवल्याने शरीराचे अपरिमित नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेवण बिलकूल बंद करू नका.
जिममध्ये जाणे टाळणे, दांडी मारणे
बर्याच वेळा आपण असा विचार करतो, की एखादा दिवस जिमला नाही गेलो, मारली दांडी, तर काय बिघडणार आहे ? पण यामुळे आपली वर्कआउटची शिस्त मोडते. तुम्ही जिमला जात असाल तर ते मध्ये बंद करणे किंवा दांडी मारणे, असे करू नका. नियमित प्रयत्नांनीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे.
वारंवार खाणं
वजन कमी करताना इतर लोक काय करतात, याची अनेक जण कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. आणि वारंवार खाणं-पिणं सुरू करतात. हे काही प्रमाणात त्यांच्यासाठी योग्य ठरू शकते, परंतु ते वजन कमी करण्यास मदत करत नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं त्यामुळे त्यांना सूट होतील अशा गोष्टीही वेगळ्या असतात. एकाचा नियम दुसऱ्याला लागू होईलच असं नाही. आपल्यापैकी अनेकांना, आपल्या शरीरानुसार, आरोग्याच्या परिस्थितीमुळे आणि औषधांमुळे वारंवार अन्न खावे लागते. पण यामुळे वजन कमी होत नाही.
जास्त वर्कआऊट करणे
वजन कमी करताना, सर्वात मोठा गैरसमज म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करणे. पण तुमच्या शरीरालाही विश्रांतीचीही गरज असते. जास्त वर्कआउट्स देखील शरीराला हानी पोहोचवतात. त्यामुळे खूप घाम गाळला तर लगेच वजन कमी होईल असे नाही. उलट त्यामुळे शरीराचे नुकसानच जास्त होऊ शकते.