Hair Straightning : स्ट्रेटनर न वापरता घरच्या घरीच स्ट्रेट करा केस, जाणून घ्या.

| Updated on: Jul 10, 2023 | 10:45 PM

काही जणींकडे हेअर स्ट्रेटनर नसते त्यामुळे त्या त्यांचे हेअर स्ट्रेट करू शकत नाहीत. तर आता आपण काही अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे बिना स्ट्रेटनरही आपण आपले केस स्ट्रेट करू शकतो.

Hair Straightning : स्ट्रेटनर न वापरता घरच्या घरीच स्ट्रेट करा केस, जाणून घ्या.
r beautiful hair
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : प्रत्येक स्त्रिला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं, त्यासाठी ती तिच्या स्किनची नेहमी काळजी घेते. स्किनसोबतच केसही सौंदर्यात भर टाकतात त्यामुळे स्त्रिया स्किनसोबत केसांचीही काळजी घेत असतात. स्त्रिया नेहमी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअरस्टाइल करत असतात. तसेच बहुतेक स्त्रियांना स्ट्रेट असलेले केस आवडतात. पण काही स्त्रियांचे केस हे कुरूळे असतात. अशा स्त्रियांना स्ट्रेट केस करायला आवडतात.

काही जणींकडे हेअर स्ट्रेटनर असते त्याच्या सहाय्याने त्या त्यांचे केस स्ट्रेट करतात पण काही जणींकडे हेअर स्ट्रेटनर नसते त्यामुळे त्या त्यांचे हेअर स्ट्रेट करू शकत नाहीत. पण काही अशा टिप्स जाणून आहेत ज्यामुळे बिना स्ट्रेटनरही आपण आपले केस स्ट्रेट करू शकतो.

स्ट्रेट केस हे आपल्या सौंदर्यात नेहमी भर घालतात. तसेच हे केस नेहमीच चमकदार रेशमी आणि लांब दिसतात. स्ट्रेट केस करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. जसे की हेअर स्ट्रेटनर, यामुळे आपण आपले केस कोरडे आणि सरळ करू शकतो. पण ज्यांच्याकडे स्ट्रेटनर नाहीये अशांनी चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही तुमचे केस स्ट्रेट करू शकता.

यासाठी तुम्हाला हेअर मास्क खूप फायदेशीर ठरेल. हेअर मास्कच्या सहाय्याने तुम्ही तुमचे केस स्ट्रेट आणि चमकदार बनवू शकता. यासाठी तुम्ही अंड, मध यापासून तुमचा हेअर मास्क तयार करू शकता. अंड, मध आणि एवोकाडा यापासून मास्क तयार करा आणि तो केसांना लावा. त्यानंतर 15 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे केस स्ट्रेट आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल.

दररोज रात्री झोपताना हेअर बन करून झोपत जा. कारण केस स्ट्रेट करण्याची ही सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत आहे. त्यामुळे तुम्हाला जर केस स्ट्रेट हवे असतील तर तुम्ही केस धुतल्यानंतर ओले केस पोनीटेलमध्ये बांधून ठेवा. यामुळे तुमचे केस स्ट्रेट होण्यास मदत होते.