Stress management: तणाव आपल्या आरोग्यासाठी ठरतो धोकादायक, असा करा ताण दूर

| Updated on: Dec 23, 2022 | 1:30 PM

स्ट्रेस म्हणजेच तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतो. थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालीन म्हटले जाते, या परिस्थितीमध्ये झोप कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो.

Stress management: तणाव आपल्या आरोग्यासाठी ठरतो धोकादायक, असा करा ताण दूर
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावाशी (Stress) झुंजत असतात. तणावामुळे शारीरिक आरोग्याचे (physical health) खूप नुकसान होते. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची भीती असते. तसेच हा ताण मनापर्यंत पोहोचला तर मानसिक स्वास्थ्यही (mental health) बिघडू शकते. कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रमाणात तणावाचा सामना करत आहे. तणाव वाढला तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागते.

अनेक वेळेस असे होते की एखादी व्यक्ती तणावात असली तरी त्याची लक्षणे त्यांना समजत नाहीत. तणाव वाढल्यावर काय होते, हे जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या जीवनातील कोणताही मोठा बदल हा तणावाचे कारण बनू शकतो. जर आपल्या जीवनात काहीतरी बदलले असेल आणि आपण ते स्वीकारू शकत नसू तर त्यामुळेही तणाव वाढू शकतो. उदाहरणार्थ, नोकरी बदलली असेल आणि तिथे नीट काम करता येत नसेल किंवा कुटुंबात घडलेली एखादी मोठी दु:खद घटना, यामुळेही ताण येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

तणाव दीर्घकाळापर्यंत राहू शकतो

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतो. थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालीन म्हटले जाते, या परिस्थितीमध्ये झोप कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो. पण दीर्घकालीन तणाव हा खूप धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्या व्यक्तीचा स्वभाव बदलतो आणि क्वचित त्या व्यक्तीच्या मनात नशेचे किंवा आत्मघाताचे विचारही येऊ शकतात.

कोरोनानंतर वाढली समस्या

काहीवेळा विनाकारण तणाव निर्माण होऊ लागतो. हे भीतीमुळे किंवा अस्वस्थतेमुळे होते. त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. कोरोना महामारीनंतर ही समस्या खूप वाढली आहे. अनेक लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसून येत आहेत.

तणाव कमी करण्याचे मार्ग

प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 8 तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे. झोप ही आपले शरीर आणि मन दोन्हीसाठी चांगली ठरते. झोप आपल्या शरीराची दुरुस्ती करण्यास आणि तणावाचे शरीरावर होणारे परिणाम कमी करण्यास मदत करते. झोपेच्या चांगल्या सवयी अंगिकारल्यास झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.

– सुसंगती पाळावी, रोज रात्री एक निश्चित वेळा ठरवून झोपा आणि सकाळी उठण्याचीही निश्चित वेळ पाळा. वे

– झोपताना खोली शांत आहे याची खात्री करा

– बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नयेत.

– झोपायच्या आधी जास्त खाणे, कॅफेनचे सेवन करणे तसेच धूम्रपान व मद्यपान करणे टाळावे.

– रोज थोडा व्यायाम करा. दिवसा शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिलात तर रात्री सहज झोप येईल.

– चांगले, ताजे व पौष्टिक अन्न खा.

– योगासने व मेडिटेशन करा.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)