मुंबई : आपल्या पैकी अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी एक उपयुक्त असे औषध म्हणजे ‘अळशी’ (Flax) या बिया वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अळशीमध्ये आरोग्याचा खजिना लपलेला असतो. त्याचे सेवन आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांपासून वाचवू शकते. अळशीच्या बिया हृदयासाठीही फायदेशीर आहेत, परंतु जर आपण कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्येने ग्रस्त असाल तर अळशीच्या बिया सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुका मेवा (Dry fruits) आणि बिया या प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानले जातात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मूठभर सुका मेवा खाल्ल्यास तुम्हाला आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात तसेच भूकही कमी होते. बदाम, काजू, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया यात बरीच पोषकतत्वे असतात. ते हेल्दी (Health) तसेच पौष्टिक असतात.
अळशी अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा 3 फॅटी एसिड प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हेच कारण आहे की अळशी पचन सुधारते.अळशी च्या बिया मधुमेह, कर्करोग आणि हृदय रोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.
अळशी कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त आहेत. अभ्यासानुसार, अळशी रोज खाल्ल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉल ची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे शक्य आहे, कारण त्यात फायबर आणि लिग्ननचे प्रमाण जास्त आहे.
अळशी चे नियमित सेवन केल्यास आपण पाचक शक्ती वाढवू शकता. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
हेही वाचा:
गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल
Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!