Fennel Tea : पचनसंबंधी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बडीशेप चहाचे करा सेवन

| Updated on: Jul 08, 2021 | 7:34 AM

बडीशेपचा उपयोग घरी चहा बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हे पेय आपल्याला सामान्य पचन समस्यांविरुद्ध लढायला मदत करू शकते. (Take fennel tea to get rid of digestive problems, know the benefits)

Fennel Tea : पचनसंबंधी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बडीशेप चहाचे करा सेवन
पचनसंबंधी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बडीशेप चहाचे करा सेवन
Follow us on

मुंबई : बडीशेप ही प्रत्येकाच्या स्वयंपाकरात सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेप जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप अनेक प्रकारे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या आहारात याचा समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यात, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, वजन कमी होणे आणि आरोग्याच्या इतर समस्या सुधारण्यास मदत होते. (Take fennel tea to get rid of digestive problems, know the benefits)

बडीशेपचा उपयोग घरी चहा बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हे पेय आपल्याला सामान्य पचन समस्यांविरुद्ध लढायला मदत करू शकते. खराब पचन ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करू शकते. आपण घरगुती उपचाराच्या स्वरुपात याचा वापर करु शकता. बडीशेपची चहा पचन समस्यांवर मात करण्यास मदत करते.

पचनासाठी बडीशेप चहाचे फायदे

बडीशेप चहा पचन प्रक्रियेस प्रोत्साहित करते आणि आपल्याला अनेक पचन संबंधी समस्यांपासून सुटका करण्यास मदत करते. हा चहा स्नायूंना आराम देतो. हे पचन क्रियेला प्रोत्साहन देते. बडीशेप अशी एक औषधी वनस्पती आहे जी चांगल्या पचनसाठी ओळखली जाते. बडीशेप चहा प्यायल्याने आपल्याला गॅस आणि सूज दूर करण्यास मदत करू शकते. हे तुमची पाचक प्रणाली निरोगी ठेवते.

कर्करोग रोखण्यास मदत करते बडीशेप

बडीशेप कर्करोगाचा त्रास रोखण्यास मदत करते. बडीशेप आपल्याला पोट, त्वचा किंवा स्तनाचा कर्करोग अशा विविध प्रकारच्या कर्करोगापासून वाचविण्यास मदत करते. हे आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

बडीशेप चहा पिण्याचे इतर फायदे

– बडीशेप चहा वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते कारण हे पचनास प्रोत्साहित करते. या चहाचे सेवन केल्याने आपले पोट बराच वेळ भरलेले राहते.
– हा चहा श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की बडीशेप दम्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते.
– बडीशेप अँटीऑक्सिडेंटचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे, ज्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.
– बडीशेप चहा प्यायल्याने मासिक पाळीच्या समस्या कमी होऊ शकतात.
– हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात देखील मदत करू शकते.

बडीशेप चहा कसा तयार करावा?

एक वा दोन चमचे बडीशेप दोन कप पाण्यात उकळा. त्यात पुदीनाची पाने घाला. हे पाणी दोन ते तीन मिनिटे उकळवा. त्यात चवीसाठी मध घालू शकता. (Take fennel tea to get rid of digestive problems, know the benefits)

इतर बातम्या

अमेरिकेच्या अभ्यासातून आनंदाची बातमी; फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोनावर 91 टक्के प्रभावी

Video | ड्रायव्हिंग करत असताना पठ्ठ्याच्या फोनवर गप्पा, पुढे जे झाले ते एकदा पाहाच !