जन्मखूण (Birth marks), ब्युटी स्पॉट्स (Beauty spots) किंवा चामखीळ म्हणा, शरीरावर हे छोटे-मोठे डाग आयुष्यभर तसेच राहतात. अनेक वेळा या खुणांमुळेच एखादा माणूस ओळखला जातो. शरीरावरील काही भागात हे असणे, फारसे धोकादायक नसते, मात्र कधीकधी हीच चामखीळ कॅन्सरचे (Cause of Cancer) कारणही बनू शकते. त्यामुळे शरीरावर तयार होणाऱ्या चामखीळीचा रंग आणि आकार याकडे लक्ष दिले पाहिजे. या कॅन्सरयुक्त चामखीळीला मेलोनामा किंवा एका प्रकारचा स्किन कॅन्सर म्हणून ओळखले जाते, जे त्वचेच्या पिगमेंट प्रोड्युसिंग सेल्समध्ये विकसित होतो. त्याला मेलानोसाइट्स असे म्हटले जाते. खरतर, सर्व प्रकारच्या स्किन कॅन्सरमध्ये मेलेनोमा कॅन्सरचे प्रमाण फक्त 1 टक्के आहे. मात्र अतिशय धोकादायक कॅन्सर आहे. वेळेवर निदान झाल्यास त्याचा योग्य इलाज होऊ शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेबाबत सतर्क राहून वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.युव्ही रेडिएशनच्या अधिक संपर्कात आल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. कडक उन्हात न जाणे, संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालणे, घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावणे असे अनेक उपाय त्यावर आहेत.
कॅन्सरयुक्त चामखीळ कोणती, हे सुरुवातीच्या काळात समजणे अवघड असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या त्वचेची तपासणी करत राहणे, गरजेचे आहे. त्वचेवर नवा डाग किंवा चामखीळीसारखे काही आढळल्यास, त्वरित डॉक्टरांकडे जावे. मेलोनामा रिसर्च फाऊंडेशनने लक्षणांची एक यादी तयार केली आहे. तुम्हाला त्यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेत कोणताही बदल, एखादी नवी चामखीळ अथवा आधीच्या चामखीळीचा रंग वा आकार बदलणे. शरीरावरील एखादी चामखीळ दुखणे, त्याला खाज सुटणे, रक्त येणे. ती चमकणे. त्वचेवर कोरडे, फ्लॅट लाल स्पॉट्स दिसणे. पाय अथवा नखांवर व गडद रंगाची लाइन दिसणे, यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे.
चामखीळीची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा वेगळी असणे.
त्याची बॉर्डर सुरकुतलेली असणे.
चामखीळीचा रंग करडा, काळा किंवा निळा दिसणे.
त्याचा आकार 6 मिलीमीटर पेक्षा जास्त असणे.
चामखीळीचा आकार वेळोवेळी बदलत राहणे.
मिलानोसाइट्स या मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींमध्ये बिघाड झाल्यास मेलेनोमा होऊ शकतो. जुन्या पेशी मेल्यावर नव्या पेशी तयार होता, मात्र त्यांच्या डीएनएमध्ये बिघाड झाल्यास नव्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होतात. यूव्ही किरणे आणि रेडिएशनच्या अधिक संपर्कात आल्यास मेलेनोमा होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच काळ्या रंगाच्या तुलनेत गोऱ्या लोकांमध्ये मेलेनोमाचा धोका अधिक असतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पूर्वी मेलेनोमा असल्यास इतर सदस्यांना कॅन्सरचा धोका असतो. वाढत्या वयानुसारही मेलेनोमाचा धोका वाढतो.
युव्ही किरणांच्या संपर्कात येणे टाळावे. बाजारात मिळणारे खास चष्मे, लोशन वापरा. बाहेर जाताना संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरा. त्वचेची वेळोवेळी तपासणी करत रहा. त्वचेवरील चामखीळीत काही बदल दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे. कुटुंबात आधी कोणालाही मेलेनोमा झाला असेल, तर कुटुंबातील सर्वांनी वेळोवेळी तपासणी करत रहावी.