किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून आपल्याला निरोगी ठेवते. पण कालांतराने किंवा आरोग्याशी संबंधित इतर कारणांमुळे किडनी खराब होते. किडनी निकामी (Kidney failure) होण्यामागे चुकीचा आहार, वृद्धत्व, स्वत:ची काळजी न घेणे, औषधांचे अतिसेवन किंवा प्रथिनांचे जास्त सेवन ही प्रमुख कारणे असू शकतात. याला एक प्रकारे क्रोनिक किडनी डिसीस असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झाल्यास किंवा आकुंचन पावल्यास, प्रत्यारोपण देखील केले जाऊ शकते, परंतु ते महाग तसेच खूप गुंतागुतीचे असते. तसेच, मूत्रपिंड निकामी झाल्यास, पीडित व्यक्तीला काही काळानंतर डायलिसिससाठी जावे लागते. ही एक वैद्यकीय उपचार (Medical treatment) पद्धती आहे, जी किडनीचे काम करते. डायलिसिस करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची अधिक काळजी घेतली पाहिजे हे खरे आहे, परंतु या उपचाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज (Many misunderstandings) आहेत. परंतु, सत्य परिस्थीती तशी नसते. जाणून घ्या, डायलिसीस बाबत लोकांच्या मनातील गैरसमज आणि त्या संबधिची वास्तविकता.
गैरसमज – डायलिसिस करणार्या व्यक्तीने प्रवास करू नये
वस्तुस्थिती: डायलिसिसवर असलेली व्यक्ती लांबच्या प्रवासाला जाऊ शकत नाही, असाही समज लोकांमध्ये पसरला आहे, परंतु तसे नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लांबचा प्रवासही करू शकता, तुम्ही जिथे जात आहात, तिथे डायलिसिसची सुविधा सहज उपलब्ध आहे याची खात्री करून घ्यावी.
गैरसमज: ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे
वस्तुस्थिती : लोकांना वाटते की डायलिसिस हा एक वेदनादायी उपचार आहे, तर आरोग्य तज्ञ म्हणतात की हा विश्वास पूर्णपणे चुकीचा आहे. सुई घातल्यावर थोडया वेदना होतात, पण डायलिसिस करताना वेदना होत नाहीत.
गैरसमज: डायलिसिसचे रुग्ण साधे अन्न खाऊ शकत नाहीत
वस्तुस्थिती: असेही मानले जाते की डायलिसिस रुग्ण सामान्य लोकांसारखे सामान्य अन्न खाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु असे रुग्ण साधे अन्नही खाऊ शकतात. फक्त ते खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये मीठ, पोटॅशियम आणि प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवावे.
गैरसमज: डायलिसिसचे रुग्ण शारीरिक हालचाली करू शकत नाहीत
वस्तुस्थिती : असे मानले जाते की डायलिसिस रुग्ण शारीरिक हालचाली करू शकत नाही, परंतु, तसे नसून, स्वतः डॉक्टर त्यांना निरोगी राहण्यासाठी पायी चालणे आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात.