हिवाळ्यात ‘ही’ 4 ड्रायफ्रूट्स दूर करतील व्हिटॅमिन डीची कमतरता, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

| Updated on: Dec 24, 2024 | 2:11 PM

Dry Fruits for Vitamin D: योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. अनेक ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. कोणत्या ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हिवाळ्यात ही 4 ड्रायफ्रूट्स दूर करतील व्हिटॅमिन डीची कमतरता, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुका मेवा खरेदी करतो. यासोबतच पाकिस्तानकडून ताजी फळेही विकत घेतली जातात.
Follow us on

आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी समतोल राखणे गरजेचे आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे, या दिवसात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता भासू लागते. व्हिटॅमिन डीचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी आपल्याला रोजचे सूर्यप्रकाश पुरेसे असते. हिवाळाच्या दिवसंमध्ये या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात.यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश करा.

आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा, आळसपणा, हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. अशा वेळी व्हिटॅमिन डीचे प्रमाण पूर्ण केले पाहिजे. हिवाळ्यात त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

अंजीर खा

निरोगी आरोग्यासाठी आपण आपल्या डाएट मध्ये ड्रायफ्रूटचे समावेश करत असतो. अंजीर व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. हाडांच्या मजबुतीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. सुकवलेले अंजीरचे सेवन केल्यास शरीरातील हाडे आणि दातांना फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

खजूर

खजूरमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. हे शरीरातील उर्जेची पातळी समतोल राखण्यास मदत करते. खजूर देखील एक नैसर्गिक स्वीटनर आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज 2 ते 3 खजूरचे सेवन करा.

जर्दाळू

जर्दाळूचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी खूप निरोगी असते, कारण हे जर्दाळू व्हिटॅमिन डी ने समृद्ध असतात. व्हिटॅमिन डीसोबतच लोह आणि पोटॅशियमही यात असते. तुम्ही जर नियमित जर्दाळूचे सेवन केल्यास हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

बदाम

आपल्या सर्वांना माहीतच असेल की, भिजवलेले बदाम रोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच बदामाचे सेवन केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी असते. बदामामध्ये फायबर, प्रथिने, तांबे आणि मॅग्नेशियम देखील असते. हे सर्व पोषक घटक हाडे आणि स्नायू मजबूत करण्याचे काम करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)