‘या’ 4 लोकांनी चुकूनही पिऊ नका हे ज्यूस, फायद्यापेक्षा कितीतरी पटीने होऊ शकते नुकसान

| Updated on: Mar 07, 2025 | 3:41 PM

आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्यूस पिणे चांगले. विशेषतः बीट, गाजर आणि आवळा यांचे ज्युस सर्वात फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हाच ज्युस काही लोकांना फायद्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान करू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की हे ज्यूस कोणत्या व्यक्तीने पिऊ नयेत.

या 4 लोकांनी चुकूनही पिऊ नका हे ज्यूस, फायद्यापेक्षा कितीतरी पटीने होऊ शकते नुकसान
this fruit juices are not for all
Follow us on

हवामानातील बदलामुळे आपल्या शरीरावर याचे कोणतेही परिणाम होऊ नये यासाठी निरोगी व योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे अनेकजण आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी हेल्दी ज्युस पितात. यामध्ये बीट, आवळा आणि गाजर यापासुन तयार केलेले ज्यूस फायदेशीर मानले जातात. कारण या ज्यूसमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ज्या लोकांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी या ज्यूसचे सेवन केल्याने कमतरता भरून निघते. त्यासोबतच या ज्यूसच्या सेवनाने त्वचाही चमकदार होते.

याशिवाय ज्या लोकांना वजन लवकर कमी करायचे आहे ते देखील या ज्युसचे सेवन करत असतात. मात्र हा ज्यूस सर्वांसाठी फायदेशीर ठरेल असे नाही. काही लोकं असेही आहेत ज्यांनी बीट, आवळा आणि गाजर यापासुन तयार केलेले ज्यूस पिणे टाळावे. कारण याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही तुमच्या आहारात या ज्यूसचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या लोकांनी ते सेवन करू नये. चला तर मग जाणून घेऊयात…

कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी हा ज्यूस पिऊ नये

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी चुकूनही बीट, गाजर आणि आवळा यांचा ज्यूस पिऊ नये. जर तुम्ही हा ज्यूस प्यायलात तर रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते. त्याच वेळी डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकते.

हे सुद्धा वाचा

किडनीच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांनी

जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तर अशा परिस्थितीत बीटाचा ज्यूस पिल्यास तुमचा आजार आणखी वाढवू शकतो. विशेषतः, किडनी स्टोन असलेल्या लोकांनी बीट, आवळा आणि गाजरचा ज्यूस पिणे टाळावे कारण बीटमध्ये असलेले ऑक्सलेट किडनी स्टोनची समस्या आणखी वाढवू शकते.

गर्भवती महिलांनी हा ज्यूस पिऊ नये

गर्भवती महिलांनी गाजर, बीट आणि आवळ्याच्या ज्यूसपासून दूर राहावे. कारण गरोदरपणात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते. शिवाय हे ज्यूस गर्भवती महिलांसाठी हानिकारक देखील ठरू शकते. जर तुम्ही गरोदर असाल आणि हे ज्यूस पिण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ज्यूसचे सेवन करावे.

ॲलर्जी असल्यास हा ज्यूस पिऊ नका

जर तुम्हाला कोणत्याही ॲलर्जीचा त्रास होत असेल तर बीट, आवळा आणि गाजरचा ज्यूस अजिबात पिऊ नका. हा ज्यूस प्यायल्याने ॲलर्जी वाढू शकते. अशातच काहींना ॲलर्जीचा त्रास असेल तर त्यांना बीट, आवळा आणि गाजर ज्यूसचे कॉम्बिनेशन शरीराला लवकर सुट होत नाही, यामुळे त्वचेवर सूज येणे, खाज येणे किंवा उलट्या होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)