पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती

| Updated on: Nov 09, 2024 | 6:21 PM

चांगल्या आरोग्यासाठी योग्य पचनसंस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. अशातच काही औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या पोटासह आरोग्याच्या इतर अनेक समस्या टाळता येऊ शकतात.

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
Follow us on

निरोगी राहायचे असेल तर तुमची पचनसंस्था योग्य असायला हवी. जर आपली पचनसंस्था योग्य नसेल तर आपले शरीर पोषक द्रव्ये शोषून घेत नाही, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. आपण हळूहळू कमकुवत होऊ लागतो. याशिवाय आरोग्याच्या काही समस्यांशी तुम्ही झगडत राहाल. तसेच तुमचे पोट नीट साफ होणार नाही. अशातच आम्ही तुम्हाला अशाच काही औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल.

त्रिफळा हे आवळा, बिभीतकी आणि हरितकी या तीन वनस्पतींचे मिश्रण आहे. दररोज त्रिफळाचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. त्रिफळा एक नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाली सुलभ होतात. यासोबतच याच्या सेवनाने अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

जेष्ठमध ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे, जी पचनसंस्था योग्य ठेवण्यास मदत करते. हे पोटाच्या पीएच पातळीचे संतुलन करते. यात ग्लाइसिरिझिन नावाचे घटक असते जे जळजळ कमी करण्यास मदत करते.

हे सुद्धा वाचा

पुदिन्यामध्ये मेन्थॉल नावाचे कंपाऊंड असते, जे पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते. तसेच पुदिन्याचं सेवन केलं तर डायजेशन म्हणजेच पचन चांगलं होतं. याने पचनासाठी आवश्यक बाइल रस जास्त तयार होतो. ज्यामुळे लवकर आणि पचन चांगलं होतं.

आल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते. याच्या सेवनाने पोटात पेटके, सूज येणे, गॅस किंवा अपचन होण्यास मदत होते.

कोरफडीच्या गराचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या या दूर होतात कारण पचनसंस्था निरोगी ठेवणारे घटक कोरफडीच्या पानांच्या आतील भागात आढळतात. याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांमध्ये म्युसिलेज नावाचे घटक आढळते, जे पोटाच्या समस्यांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.