नवी दिल्ली – आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न करत असते. फिटनेस (fitness) जपण्यासाठी काही जण योगासने करतात, तर कुणी व्यायाम अथवा ॲरोबिक्सची मदत घेतात. बऱ्याच फिटनेसप्रेमींना धावणंही खूप आवडतं. धावणे (Running) हा फिटनेससाठी एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठीही धावण्याचा पर्याय उत्तम मानला जातो. आजही बरेच जण धावण्याला प्राधान्य देतात. पण तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलटं धावून निरोगी राहू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? बॅकवर्ड रनिंगबद्दल (Backward Running) अधिक माहिती जाणून घेऊया.
बॅकवर्ड रनिंग म्हणजे काय?
सरळ धावण्यापेक्षा बॅकवर्ड रनिंगमध्ये स्नायूची वेगळी हालचाल होते. बॅकवर्ड रनिंग करताना जास्त को-ऑर्डिनेशनची (समन्वय साधण्याची) गरज असते, त्यामुळे मेंदूवरही चांगला प्रभाव पडतो.
बॅकवर्ड रनिंगचे फायदे
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, बॅकवर्ड रनिंगमुळे खेळाडूंमध्येही बरेच बदल दिसून आले. जे खेळाडू दीर्घकाळापासून सरळ किंवा पुढे धावत होते, त्यांना जेव्हा बॅकवर्ड रनिंग करण्यास सांगण्यात आले तेव्हा देण्यात आले, तेव्हा त्यांची धावण्याची पद्धत बदलली आणि पूर्वीपेक्षाही अधिक सरस झाली. काही संशोधनानुसार, फॉरवर्ड रनिंगपेक्षा बॅकवर्ड रनिंगमुळे वजन जास्त कमी होते.
कोणी करावे बॅकवर्ड रनिंग ?
एखाद्या व्यक्तीच्या गुडघ्याला दुखापत झाली असेल आणि रिकव्हरी मोडवर असेल, तर बॅकवर्ड रनिंगद्वारे त्या व्यक्तीचे गुडघे मजबूत होऊ शकतात. कारण अशा परिस्थितीत त्यांना बॅकवर्ड रनिंग सहज जमेल. मात्र हे करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)