blood cancer : कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार (Fatal disease) आहे ज्याचे नाव ऐकताच प्रत्येकाचा थरकाप होतो. यामुळे बाधित व्यक्तीच नव्हे तर नातेवाईकही अस्वस्थ होतात. हा आजार अनेक प्रकारे होतो. या आजाराच्या पकडमध्ये लहान मोठया प्रमाणात येत आहेत. दरवर्षी 28 मे हा दिवस जागतिक रक्त कर्करोग दिन (Leukemia Day) रोजी साजरा केला जातो. भारतात दरवर्षी हजारो मुले ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरला बळी पडतात. लहान मुलांना होणाऱया रक्ताच्या कॅन्सरला ल्युकेमिया असेही म्हणतात. जागतिक रक्त कर्करोग दिनानिमीत्त, लोकांना या आजाराच्या गंभीरतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो. या आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य असल्याचे सांगितले जाते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये परिस्थिती अशी होते की आजारी व्यक्तीचा मृत्यू (Death of a person) होतो. या आजाराची सुरूवातीला काय लक्षणे दिसतात याबाबत माहिती असणेही गरजेचे आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमीत्त, ब्लड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देण्यात आली आहे. जी लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सरने ग्रस्त असताना दिसतात. खरं तर, हा एक कर्करोग आहे जो शरीरातील रक्त तयार करणार्या ऊतकांमध्ये होतो. त्यामुळे शरीरात असामान्य रक्तपेशी तयार होऊ लागतात. या आजारामुळे बाधित व्यक्तीचे शरीर संसर्गाशी लढण्याची शक्ती गमावून बसते. असे म्हटले जाते की बहुतेक प्रकरणांमध्ये, 15 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले याला बळी पडतात. त्यांच्यामुळे होणाऱ्या या आजाराला तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया रक्त कर्करोग म्हणतात.
जर एखाद्या मुलाच्या शरीरातून अचानक रक्तस्त्राव होण्याची समस्या सुरू झाली तर त्याला ब्लड कॅन्सर झाला असावा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या स्थितीत मुलांच्या नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव सुरू होतो. जेव्हा असे होते तेव्हा मुलाच्या शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात.
मुलांना सांधेदुखीची तक्रार होऊ लागली, तर ही गंभीर बाब आहे. कारण मुलं खूप सक्रिय असतात आणि अशा समस्या म्हातारपणात दिसतात. जर तुमच्या मुलाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.
ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलाच्या शरीरात सूज येऊ लागते. त्याच्या पायावर, हातावर किंवा तोंडावर सूज येऊ लागते. काही प्रकरणांमध्ये, मुलाचे वजन कमी होते आणि भूक न लागण्याची समस्या देखील होते.