नवी दिल्ली | 18ऑगस्ट 2023 : पावसाळ्यात कंजंक्टिव्हायटिसचा आजार अतिशय सामान्य आहे. यामध्ये डोळे बरेच लाल होतात, तसेच डोळ्यांना खाज सुटणे, पाणी येणे असा त्रास होतो. डोळ्यांमध्ये घाण साचल्याने सकाळी उठल्यावर डोळे उघडणे कठीण होते. अशा परिस्थितीत डोळे सुडलेले दिसतात आणि जास्त प्रकाश सहन होत नाही. डाएट व जीवनशैलीमध्ये बदल करून तुम्ही डोळ्यांची काळजी (eye care) घेऊ शकता. काही पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात, ते कोणते हे जाणून घेऊया.
ब्रेड व पास्ता
रिसर्चनुसार, ब्रेड आणि पास्तामध्ये आढळणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे वया-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनची शक्यता वाढते, ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट
आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार, हायड्रोजनेटेड ऑइल आणि ट्रान्स फॅट्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. ट्रान्स फॅटमुळे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जे धोकादायक ठरू शकते.
सोडिअम
ज्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, ते खाल्ल्याने हाय बीपीचा त्रास होतो. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्याही वाढू शकतात.
प्रोसेस्ड मीट
प्रोसेस्ड मीटमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात मिठामुळे शरीरात हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांसह डोळ्यांच्या समस्या देखील वाढू शकतात.
मद्य
मद्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त मद्य प्यायल्याने कमी वयातच मोतीबिंदू होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)