या वाईट सवयींचा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो नकारात्मक परिणाम

| Updated on: Jan 03, 2023 | 9:23 AM

तुमच्या जीवनातील दैनंदिन दिनचर्येचा अभ्यास करून त्यातील कोणत्या सवयींचे दुष्परिणाम होत आहेत, हे समजू शकते.

या वाईट सवयींचा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो नकारात्मक परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य (mental health) हा विषय चर्चेत आहे. मात्र तरीही काही अशी लोकं आहेत जे विषयाबद्दल विशेष चिंतीत नाहीत. आपल्या (काही) सवयींमुळे मानसिक आरोग्यावर (negative impact on mental health) परिणाम होतो. वाईट सवयींमुळे आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो. काही लोकांना या (वाईट) सवयी त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहेत, हेच समजत नाही. वाईट सवयींमुळे (bad habits) आपण आजारी पडू शकतो हे तुम्हाला माहीत असेलच !

जंक फूड खाणे, व्यायाम न करणे, किंवा योग्य दिनचर्येचे पालन न करणे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि कदाचित आपल्याला हृदयविकारही होऊ सकतो. या वाईट सवयी ज्याप्रमाणे आपल्या शरीराची हानी करतात, त्याचप्रमाणे त्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे डिप्रेशन (नैराश्य), एंग्झायटी किंवा तणाव या समस्या निर्माण होण्याच धोका उद्भवतो.

या 4 वाईट सवयींचा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो नकारात्मक परिणाम

हे सुद्धा वाचा

नकारात्मक मानसिकता

आपलं मन खूप गुंतागुंतीचं आहे. त्यात वेळोवेळी नकारात्मक विचार येत असतात. मात्र या विचारांना आणखी प्रोत्साहन दिल्यास अपयशाची मानसिकता निर्माण होऊ शकते. आणि यामुळे आपण जीवनात यशस्वी होण्याच्या क्षमतेतेही बाधा येऊ शकते. आपलं आयुष्य कठीण, अर्थहीन आणि कोणतीही आशा नाही, असे वाईट विचार मनात येऊ शकतात, ज्यामुळे आपण आयुष्यात प्रगती करू शकणार नाही. ते प्रगतीच्या वाटेतील अडथळे बनू शकतात. हे अयशस्वी विचार आणि भावनांमुळे आपल्या मानसिक आरोग्याचे अतोनात नुकसान होऊ शकते, ज्यामुळे एंग्झायटी आणि डिप्रेशन येते. तसेच (या विचारांमुळे) आपण भविष्याचा विचार करणे, भविष्यातील ध्येय ठेवणे यापासून परावृत्त होतो व नैसर्गिक प्रतिभा कमी होऊ शकते.

सोशल मीडियामध्ये गुरफटणे

आपले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी संपर्कात राहण्यासाठी, जगातील नवनव्या घडामोडी, बातम्या कळण्यासाठी आणि व्हायरल होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन आहे. हे जरी सकारात्मक असलं तरी याची एक वाईट बाजूही आहे, जी अनेक लोकांच्या लक्षातही येत नाही. बरेच लोक दररोज सोशल मीडिया वापरतात, पण ते वापरतानाच इतरांच्या आयुष्याशी (स्वत:च्या आयुष्याची) सतत तुलना सुरू असते. यामुळे मत्सर वाटणे, हेवा वाटणे नैराश्य आणि एंग्झायटी या भावना निर्माण होतात. ज्या आपल्या मानसिक आरोग्यासाठी निश्चिचतच चांगल्या नसतात.

घरात अडकून राहणे 

दीर्घकाळ घरात राहिल्याने तुम्ही बराच काळ (अंधारात) अडकून राहू शकता, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे ताण-तणाव, एंग्झायची आणि नैराश्याची लक्षणे दिसून येतात. खूप वेळ घरात राहिल्याने व्हिटॅमिन डीची कमतरताही निर्माण होते. तुम्ही आळशी झालात तर रोजची कामे करण्याचा उत्साहही निघून जातो आणि काही करावेसेच वाटत नाही. बैठ्या जीवनशैलीचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

पुरेशी झोप न घेणे

रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत किंवा मोबाईलवर टाईमपास करत जागणे हे एखाद्या दिवशी किंवा वीकेंडला करणे चांगले वाटते, पण दररोज ही सवय चांगली नाही. चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखायचे असेल तर पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे तुमचे शरीराला तर आराम मिळतोच पण मनही रिलॅक्स होते. पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचा मूड, ऊर्जेची पातळी आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुमची झोप कमी झाली असेल, तर तुम्हाला नैराश्य आणि एंग्झायटी या समस्यांशी सामना करावा लागू शकतो.

तुमच्या जीवनातील दैनंदिन दिनचर्येचा अभ्यास करून त्यातील कोणत्या सवयींचे दुष्परिणाम होत आहेत, हे समजू शकते. या वाईट सवयींच्या जागी काही चांगल्या, आरोग्यदायी सवयी अवलंबवा, त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.