ए जाड्या, ए जाड्या.. असं कुणी चिडवू नये असं वाटतं असेल तर ‘हे’ करा; वेगाने वजन कमी होईल

| Updated on: Jan 19, 2023 | 11:03 AM

अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे बहुतांश लोकांना लठ्ठपणाचा त्रास सहन करावा लागतो. रोजच्या जीवनातील काही सवयीमुळेही आपले वजन वाढू शकते. त्या सवयी वेळीच थांबवल्यास वजन कमी करणे शक्य होईल.

ए जाड्या, ए जाड्या.. असं कुणी चिडवू नये असं वाटतं असेल तर हे करा; वेगाने वजन कमी होईल
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – व्यस्त जीवनशैलीमुळे काही लोकं अनहेल्दी डाएट (unhealthy eating habits) फॉलो करतात. पण त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे अनेक प्रकारे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांचे वजन वाढून त्यांना लठ्ठपणाचाही (obesity) सामना करावा लागतो. झपाट्याने वाढणाऱ्या वजनासाठी आपल्या रोजच्या जीवनातील काही सवयीही (daily habits can trigger weight gain) कारणीभूत असू शकतात. अशा स्थितीत या सवयींवर नियंत्रण ठेवल्यास काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल.

वजनवाढ रोखण्यासाठी बहुतांश लोक हे त्यांचा आहार आणि व्यायामावरच लक्ष केंद्रित करतात. पण आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयीही वजन वाढवण्याचे काम करतात. अशा स्थितीत या सवयींवर नियंत्रण ठेवून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्सबद्दल जाणून घेऊया.

गरजेपेक्षा जास्त खाणे टाळावे

हे सुद्धा वाचा

टीव्हीसमोर किंवा मोबाईल लावून जेवणे अनेक लोकांना आवडतं. मात्र, स्क्रीनवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, लोक बरेचदा अती प्रमाणात खातात. ज्यामुळे ते लठ्ठ होऊ लागतात. म्हणूनच जेवताना टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर राहणे चांगले. तसेच गरज असेल तेवढेच खावे, जास्त खाणे टाळावे.

बराच काळ उपाशी राहू नका

व्यस्त जीवनशैलीमुळे काही लोकं योग्य आहार घेणे टाळतात. अशा स्थितीत बराच वेळ उपाशी राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण कमी होऊ लागते. त्याच वेळी, भुकेमुळे मेंदूमध्ये ग्लुकोजची कमतरता देखील निर्माण होते. त्यामुळे तणाव जाणवू लागतो, चिडचिड होऊ लागते आणि त्याचसोबत पोटाची चरबीही वाढू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही खाऊन स्वतःला निरोगी ठेवू शकता. जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. त्याने वजनवाढ रोखता येऊ शकते.

आरामात खावे

काही लोकांना घाईघाईत जेवण्याची सवय असते. पण पटापट खाल्ल्याने अनेकदा गरजेपेक्षा जास्त अन्नपदार्थ खाल्ले जातात. याचा शरीराच्या पचन प्रक्रियेवर देखील परिणाम होतो आणि त्यामुळेच तुमचे वजन वेगाने वाढू लागते. म्हणूनच जेवताना शांतपणे, प्रत्येक घास नीट चावून चावून खा.

नाश्ता करणे टाळू नका

सकाळच्या घाईच्या वेळेत अनेक लोकं नाश्ता न करताच कामाला जातात. त्यामुळे मेंदू आणि शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत बरेच लोक लठ्ठही होतात. म्हणूनच सकाळच्या वेळेस पोटभरीचा नाश्ता करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाश्ता करणे टाळू नये.

पुरेशी झोप घ्यावी

झोपेच्या कमतरतेमुळेही अनेकांना वजन वाढण्याचा सामना करावा लागतो. रात्री उशिरा झोपल्याने आणि सकाळी लवकर उठल्याने झोप पूर्ण होत नाही आणि शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)