नवी दिल्ली – ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) हा स्त्रियांमध्ये सर्वाधिक वारंवार निदान झालेला कर्करोग (cancer) आहे. अनुवांशिकता आणि जीवनशैली यासह अनेक घटक ब्रेस्ट कॅन्सरच्या (breast cancer) जोखमीवर प्रभाव टाकतात. धूम्रपान (smoking) , जास्त मद्यपान करणे (alcohol) , इस्ट्रोजेन एक्सपोजर, आहाराच्या अयोग्य पद्धती, हे ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीशी संबंधित जीवनशैली घटकांपैकी आहेत. पालेभाज्या, लिंबूवर्गीय (आंबट)फळे, बेरीज, फॅटी फिश आणि आंबवलेले पदार्थ हे ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षण करू शकतात. परंतु आहारातील काही पदार्थ व पेयं अशी आहेत आहेत, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
दूध
लोमा लिंडा युनिव्हर्सिटी हेल्थ येथील संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज एक कप दूध प्यायल्याने स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 50% वाढतो. डेअरीतील दुधातील संप्रेरक घटक ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. या दुधाऐवजी सोयामिल्कचा वापर केल्याने धोका कमी होतो.
मद्यपान
ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, अन्ननलिकेचाकॅन्सर, यकृताचा कॅन्सर, स्वरयंत्राचा कॅन्सरआणि कोलोरेक्टम कॅन्सर अशा सात प्रकारच्या कॅन्सरशी मद्यपान निगडीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ब्रेस्ट कॅन्सर हा जगभरातील महिलांमध्ये मद्यपानामुळे होणारा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.
फास्ट फूड
वारंवार फास्ट फूड खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि ब्रेस्ट कॅन्सर यांसह अनेक आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ खाल्ल्याने केवळ ब्रेस्ट कॅन्सर नव्हे तर स्वादुपिंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, तसेच व्हॉईसबॉक्सचा कॅन्सर होऊ शकतो.
प्रक्रिया केलेले मांस
ज्या स्त्रिया बेकन आणि सॉसेजसारखे भरपूर प्रक्रिया केलेले मांस खातात त्यांना ब्रेसट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो, असे अभ्यासातून असे दिसून आले आहे.
अती प्रक्रिया केलेले पदार्थ
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. म्हणून पॅकबंद पदार्थ आणि बेक केलेले पदार्थ, इन्स्टंट नूडल्स आणि सूप, गोड किंवा चवदार पॅक केलेले स्नॅक्स यासारखे उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळणे चांगले.
अतिरिक्त साखर
साखरेचा ब्रेस्ट कॅन्सरशी थेट संबंध नाही. पण जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे लठ्ठपणा आणि जळजळ होऊ शकते, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.