Zinc Deficiency : तुमच्या शरीरात झिंकची कमतरता आहे का ? ‘या’ लक्षणांवरून ओळखा, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

| Updated on: Jan 26, 2023 | 12:15 PM

शरीरात झिंकची कमतरता असल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अचानक वजन कमी होण्यासह अनेक समस्या असू शकतात. झिंकची कमतरता दूर करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

Zinc Deficiency : तुमच्या शरीरात झिंकची कमतरता आहे का ? या लक्षणांवरून ओळखा, आहारात करा या पदार्थांचा समावेश
Image Credit source: TV9 Telugu
Follow us on

नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्व पोषक तत्वे (nutrition) आवश्यक असतात. जर शरीरात कोणत्याही जीवनसत्वाची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यातीलच एक महत्वाचे पोषक तत्वं आहे ते म्हणजे झिंक (zinc). त्याची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य समस्या उद्भवू शकतात. झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती (boost immunity) मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे संक्रमण टाळू शकता. शरीरात झिंकच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि कोणते अन्नपदार्थ शरीरात त्याचा पुरवठा करू शकतात, हे जाणून घेऊया.

शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे ही लक्षणे दिसतात.

– अचानक वजन कमी होणे.

हे सुद्धा वाचा

– अन्नाची चव लागत नाही

– त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.

– केस जलद गळणे.

– जखमा भरण्यास विलंब होतो.

– जास्त अशक्तपणा जाणवतो.

शरीरातील झिंकची कमतरता दूर करण्यासाठी हे पदार्थ खावेत

1) शेंगदाणे खा

शेंगदाण्यात झिंक मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन-ई, पोटॅशिअम, फायबर, आयर्न यांसारखी पोषकतत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

2) दही खावे

शरीरातील झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही नियमितपणे दह्याचे सेवन करू शकता. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचन सुधारण्यास मदत करतात, तसेच अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

3) अंडी खा

अंडी हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानला जातो. तसेच, त्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. अंड्याचे सेवन करून तुम्ही शरीरातील झिंकची कमतरता दूर करू शकता.

4) जेवणात लसणाचा समावेश करा

लसणात झिंक चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम यांसारखे पोषक घटक आढळतात. शरीरातील झिंकची कमतरता दूर करण्यासाठी लसणाचा आहारात नियमित वापर केला जाऊ शकतो.