नवी दिल्ली – कोंड्याचा त्रास (dandruff problem) सुरु झाला तर त्यापासून सुटका होणे कठीण असते, पण त्यामुळे काही वेळ लज्जास्पद परिस्थितीही उद्भवते. कोंडा झाला की डोक्याला सतत खाज सुटते आणि आपला स्काल्पही तेलकट होतो. मात्र यावरील उपचार अतिशय सोपा आहे. त्याचा उपचार सोपा आहे. थंडीच्या दिवसात (winter season) कोंडयाचा त्रास अधिक होतो, ज्यामुळे स्काल्प कोरडा होऊन खाज सुटते. कोरडेपणा आणि थंड वारा यामुळे कोंड्याला प्रोत्साहन मिळते. मात्र काही पदार्थांचे (food items) सेवन केल्यास कोंड्याचा त्रास कमी होऊ शकतो.
1) सूर्यफुलाच्या बिया
कोंड्याच्या समस्येवर सूर्यफूलाच्या बिया या नैसर्गिक उपचार म्हणून कार्य करतात. या बियांचे वैशिष्ट्या तुम्हाला माहीत नसेल तर आजच त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. सूर्यफुलाच्या बिया या विविध प्रकारच्या पोषक तत्वांनी भरलेल्या असतात, जे स्काल्पच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन बी देखील भरूपर असते. सूर्यफूलाच्या बिया या मेटाबॉलिजमला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पचन सुधारते व अपचनामुळे होणारा कोंडा कमी होतो.
2) आलं
आल्याच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात. त्यापैकी एक फायदा म्हणजे स्काल्पवरील कोंडा कमी होणे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे बऱ्याच लोकांना कोंडा होतो. आलं हे पचन सुधारण्याचे कार्य करते, ज्यामुळे कोंडा दूर होतो. तसेच, आल्यामधील अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्म यामुळेही कोंड्याचा त्रास कमी होतो.
3) पपई
पपईमध्ये पपेन नावाचे एक एंझाइम असते, जे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास होत असेल तर पपईचा आहारात अवश्य समावेश करा.
4) लसूण
लसणामध्ये ॲलिसिन नावाचा अँटीफंगल घटक असतो, जो कोंड्याच्या उपचारासाठी वापरला जातो. रोज लसूण खाल्लं तर कोंड्यापासून खूप आराम मिळेल. याशिवाय तुम्ही स्काल्पवरही लसूण कुस्करून लावू शकता. 15 मिनिटांनंतर डोके धुवावे.
5) चणे
चण्याचे सेवना केल्यानेही कोंड्यापासून आराम मिळतो. चण्यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन -बी 6, ही दोन खनिजे असतात जी कोंड्याशी लढण्याचे कार्य करतात. खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही चण्याची पेस्ट बनवून ती टाळूवरही लावू शकता.
6) अंडी
अंड्यामध्ये झिंक आणि बायोटिन असते. हे पोषक घटक केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात व स्काल्पही निरोगी ठेवतात. झिंक आणि बायोटिनयुक्त पदार्थ हे आपल्या स्काल्पचे कोंड्यापासून संरक्षण करतात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)