आजकाल विविध सुख सुविधांमुळे आपल्या शरीराच्या हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे आजारपण आणि इन्फेक्शनचा धोका प्रचंड वाढला आहे. पुरुषांपेक्षा महिला अधिक इन्फेक्शन आणि आजारांचा धोका असतो. मासिक पाळी, हार्मोन्समध्ये बदल, प्रेग्नसी आणि आहारातील पोषण तत्वांच्या कमरतेने महिलांना इन्फेक्शनचा धोका खूप असतो. महिलांनी त्यामुळे ही चार व्हॅक्सिन घेतलीच पाहीजेत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि आजारपण टळेल. मुलींना लहानपणा ते तरुणपणाप्रयत्न ही वेळोवेळी ही व्हॅक्सिन दिली तर त्यांचे जीवन आरोग्यदायी आणि आनंददायी होईल…
प्रत्येक कुटुंबात महिलांच्या पोषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेतात परंतू स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. दहा पैकी सात महिला आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे महिलांना थायरॉइड, शुगर, कॅन्सर आणि अनेक संक्रमक आजार सहज होऊ शकतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना लसीकरणाची जादा गरज असते.
प्रत्येक महिलेने एचपीव्ही व्हॅक्सिन घेणे गरजेचे आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस रोखण्यासाठी हे व्हॅसिन आहे. हे व्हॅसिन एचपीव्हीच्या व्हायरस पासून वाचवते. एचपीव्ही संक्रमण झालेल्या व्यक्तीची लक्षणे स्पष्ट दिसतात. शरीराच्या काही भागात आणि गाठीत याचे लक्षणं दिसता. याच्या गाठी आणि चामखिळ हात पाय आणि गुप्तांगावर दिसतात. एचपीव्ही इन्फेक्शनचा वेळीच इलाज केला नाही तर कॅन्सर सारखा आजारात त्याचे रुपांतर होते. 9-45 वयाच्या मुली आणि महिलांनी हे एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यायला हवे.
एमएमआर व्हॅक्सिन महिलांची इम्युनिटी पॉवर वाढविण्यास मदत करते. महिलांच्या गळ्याच्या ग्रंथी सुजून कण्ठमाला ( गंडमाला किंवा अपची देखील म्हणतात) आणि रूबेला सारखे आजार होण्याची शक्यता असते.त्यामुळे प्रेग्नसी दरम्यान एमएमआर व्हॅक्सीन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी
इन्फ्लूएंजा हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे. तेर नाक आणि गळ्यात होते. या आजारात फुप्फुसावर देखील मोठा वाईट परिणाम होतो. इन्फ्लुएंजात महिलांना शरीर दुखते, नाक वाहते,श्वास घेता येत नाही. ताप आणि गळ्यात इन्फेक्शन होते. थकवा आणि खोकला येतो. इन्फ्लूएंजा व्हॅक्सिन घेतले असेल तर फ्लू शी लढण्याची ताकद मिळते. शरीरात एंटीबॉडी बनणे आणि इम्युन सिस्टीम मजबूत बनण्यास मदत होते.
टीडीएपी व्हॅक्सिन तीन गंभीर आजार टेटनस (लॉकजॉ), डिप्थीरिया आणि पर्टुसिस यांच्याशी लढायला मदत करतो. मुलींना टीडीएपीची लस 11 वा 12 व्या वर्षी दिली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याने टीडीएपी व्हॅक्सिन घेतली पाहीजे.