नवी दिल्ली – आपल्या तारूण्यात आपण त्वचेबद्दल (skin care) किती निश्चिंत होतो. थोडंस फाऊंडेशन आणि काजळ, हा आपला पूर्ण मेकअप असायचा. पण जसजसं वय वाढत जातं मेकअपचे (makeup) थरही वाढू लागतात. (वय वाढणं) हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदलणं शक्य नाही. पण काही वेळा आपल्या सवयींमुळेही हे होऊ शकतं. पण अनेक वेळा असं दिसून येतं की स्त्री किंवा पुरुष त्यांच्या वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागतात आणि ते बदलणं हे आपल्याच हातात असतं. तुम्हाला कदाचित हे जाणवत नसेल पण रोजच्या आयुष्यातील काही सवयींमुळे आपण वयापेक्षा अधिक मोठे (early ageing) दिसू लागतो. त्या सवयी कोणत्या हे जाणून घेऊया.
1) साखरेचे खूप जास्त सेवन करणे
जर तुम्ही सकाळ-संध्याकाळच्या चहामध्ये साखर किंवा स्नॅक्समध्ये खूप गोड पदार्थ खात असाल तर एका दिवसाच्या प्रमाणानुसार साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे. आपण ते नियंत्रित करणे आवश्यक आहे. साखरेच्या कणांमुळे कोलेजनचे ग्लायकेशन होते आणि या प्रक्रियेमुळे कोलेजनची निर्मिती झपाट्याने कमी होते.
2) शरीरात पाण्याची कमतरता
डिहायड्रेशनमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात आणि ते आपल्या चेहऱ्यावरही दिसून येते. पाण्याची कमतरता असणाऱ्या त्वचेची लक्षणे स्पष्टपणे तुमचा चेहरा आणि ओठांवर दिसून येतात. तुम्ही जर पुरेसे पाणी प्यायला नाहीत, तर तुमच्या त्वचेतील ओलावाही नाहीसा होतो.
3) मद्यपान करणे
मद्यपान करणे हे आपल्या त्वचेसाठी अतिशय हानिकारक आहे. आणि तुम्ही जर दररोज दारू पीत असाल तर नक्कीच या सवयीला बाय म्हणण्याची वेळ आली आहे. मद्य हे आपल्या त्वचेतून द्रव काढते. एकदा तुमच्या त्वचेवर कोरडेपणा आला की सुरकुत्या येण्यास फारसा वेळ लागत नाही.
4) त्वचा मॉयश्चराइज न करणे
दिवसभर आपण व्यस्त असतो आणि रात्र होईपर्यंत आपण इतके थकलेले असतो की आपण त्वचा मॉयश्चराइज करण्याकडे सरळ दुर्लक्ष करतो. ही अनेक वाईट सवयींपैकी एक आहे ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा मोठे दिसू शकता.
5) झोपण्यापूर्वी मेकअप न काढणे
जर तुमच्याकडे सकाळी-सकाळी मेकअप करण्यासाठी वेळ आहे आणि काही तासांनंतर थोडंसं टच-अप करत असाल तर मेकअप काढण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठीही तुम्ही आवर्जून वेळ काढला पाहिजे. मेकअप न काढता झोपायला गेलात तर तुमच्या त्वचेची छिद्र आकुंचन पावतात आणि चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स येऊ शकतात.
6) अतिरिक्त एक्सफोलिएशन
तुम्ही दररोज तुमची त्वचा एक्सफोलिएट करता का? जर याचे उत्तर हो असं असेल तर हे ताबडतोब थांबवा. कारण कठोर स्क्रबचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. आणि सुरकुत्याही येऊ शकतात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)