मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून प्रत्येकाला काहीना काही गरमागरम पदार्थ खाण्याचा मूड होतो. टपरीवरची मग भजी, वडापाव, समोसा अशा अनेक पदार्थांवर लोक मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसतात. हे पदार्थ खायला चविष्ट लागतात पण बहुतेक लोकांना असे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट खराब होण्याचा त्रास होतोच. मग पोट बिघडल्यानंतर आपण गोळी आणून खातो तर बहुतेक लोक हे घरगुती उपाय करतात. तर आता आपण आपल्या आजीचे काही असे गुणकारी उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे पोट बिघडल्याची समस्या लगेच कमी होते.
जर तुमचे पोट बिघडले असेल तर तुम्ही केळी खायला हवी. कारण केळीमध्ये पोटॅशियम असते जे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करते. त्यामुळे पोट बिघडल्यानंतर एक किंवा दोन केळी खा यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
पोट बिघडल्यानंतर दही खा, दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक असते जे लूज मोशनच्या बॅक्टेरियाला मारते. त्यामुळे पोट बिघडल्यानंतर लगेच दही खा यामुळे हा त्रास लवकर कमी होईल.
पोट खराब झाल्यानंतर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. त्यामुळे अशावेळी पाण्यात मीठ आणि साखर टाकून ते प्यावं. यामुळे पोटाचा हा त्रास कमी होण्यास मदत होते.
पोट बिघडल्यानंतर लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी पिल्यानंतर लूज मोशनचा त्रास कमी होतो. कारण लिंबाच्या रसामध्ये अम्लीय घटक असतात जे आतड्यांमधील बॅक्टेरियाला नष्ट करतात त्यामुळे आतडे स्वच्छ होते. तर पोट खराब झाल्यानंतर लिंबू पाणी प्या त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.