नवी दिल्ली : तुम्हाला माहिती आहे का की आपल्या स्वयंपाकघरात (kitchen) काही गोष्टी अशा असतात की त्या सायलेंट किलर (silent killer) म्हणून काम करतात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यात पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतीचाही समावेश आहे. आता पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही तेव्हा पाणी आपल्यासाठी कसे घातक ठरेल? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण एका रिपोर्टनुसार, स्वयंपाकघरातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे ओव्हरडोस (overdose) आपल्यासाठी हळूहळू मारक ठरू शकतो. ड्रग्स आणि अल्कोहोलप्रमाणेच त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा आपण रोज वापर करतो, पण त्या आपले नुकसान करतात. त्यांच्या वापराने आपण स्वत: च्या जीवनात समस्या निर्माण करत आहोत.
व्हिटॅमिन डीचा ओव्हरडोस
ब्रिटनमधील एका व्यक्तीने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डीचे सुमारे 1.5 लाख आंतरराष्ट्रीय युनिट्स वापरले, जे सामान्यपेक्षा 375 पट जास्त होते. असे केल्याने त्याला मळमळ, विचित्र वेदना, जुलाब आणि उलट्या जाणवू लागल्या. जेव्हा व्हिटॅमिन डी जास्त असते तेव्हा शरीर ते बाहेर टाकते, परंतु जर तुम्ही दररोज खात असलेल्या पदार्थांमधून त्याचा जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
जास्त पाणी पिणेही नुकसानकारक
आपल्या जीवनासाठी पाणी किती महत्वाचं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात प्यायल्याने दोन्ही बाबतीत शरीराची हानी होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने इलेक्ट्रॉयल बलेन्स बिघडू लागतो. त्याचा परिणाम मेंदूवरही दिसून येतो. जास्त पाणी शरीरात सोडियमची पातळी वाढवते आणि अशा परिस्थितीत हायपोनेट्रेमिया होऊ शकतो.
मीठामुळेही होते नुकसान
अलीकडेच डब्ल्यूएचओचा एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये आपल्याला फक्त 0.5 ग्रॅम मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय लोक दररोज सुमारे 10 ग्रॅम मीठ खातात. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढले की व्यक्ती कोमात जाण्याची किंवा मृत्यूचा धोका वाढतो.
सफरचंदाचा बिया
सफरचंदाच्या बिया या विषासमान ठरू शकतात आणि मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात यात शंका नाही. ब्रिटानिकाच्या मते, बियांमध्ये ॲ मिग्डालिन नावाचे रासायनिक संयुग असते ज्यामध्ये सायनाइड आणि साखर दोन्ही असतात. हे रसायन अत्यंत विषारी हायड्रोजन सायनाइड (HCN) सोडते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
ब्लॅक टी
चहा किंवा कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या झोपेची व्यवस्था बिघडवू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की ब्लॅक टीच्या माध्यमातून आपण ऑक्सलेटचा ओव्हरडोज घेतो. त्यामुळे त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.