मुंबई, आजही भारतात, लग्न होताच समाजाकडून मुलीला अपत्य प्राप्तीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जातो. मुलं जन्माला घालणे हे स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि जोखमीचा निर्णय असतो. यासाठी शारीरिकदृष्ट्या ती किती सक्षम आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक वेळा तिला स्वतःच्या इच्छेने नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या इच्छेमुळे आई व्हावे लागते. त्याचबरोबर एखाद्या महिलेला काही परिस्थितीत गर्भपात (Abortion) करायचा असेल तर त्यासाठी तिला संपूर्ण कुटुंबाचीही मान्यता घ्यावी लागते. जर एखादी स्त्री लग्नाआधी गरोदर (Pregnant Before Marriage) राहिली तर तिच्या आयुष्यातील ही सर्वात भयानक परिस्थिती असते. तिला गर्भपातासाठी अनेक चोर मार्ग शोधावे लागतात.
अनेक वेळा समाज आणि कुटुंबाच्या भीतीने स्वत:चा गर्भपात करून मुलींचा जीवही धोक्यात येतो. पण गर्भधारणा आणि गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निकालानंतर महिलांना दिलासा मिळाला आहे. गर्भधारणा आणि गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, महिला विवाहित असो किंवा नसो, तिला गर्भपात करण्याचा सारखाच अधिकार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर गर्भपातानंतर जाणवणाऱ्या समस्यांची चर्चा होऊ लागली आहे. गर्भपातानंतर जर खालील समस्या जाणवत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. जाणून घेऊया यात कोणकोणत्या समस्यांचा समावेश आहे.
तीव्र वासाचा स्त्राव- जर गर्भपातानंतर, रक्तस्त्राव व्यतिरिक्त, योनीतून मोठा स्त्राव होत असेल, तसेच त्याचा तीव्र वास येत असेल, तर अशा परिस्थितीत देखील स्त्रीने डॉक्टरांना कळवावे.