‘या’ बिया त्वचा चमकदार आणि केस ठेवतील मजबूत, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

| Updated on: Dec 31, 2024 | 9:25 PM

आपल्या आहारात या बियांचे समावेश करा. कारण बिया त्वचेला आतून ओलावा तर देतातच, शिवाय केस मजबूत आणि चमकदार ही बनवतात. यामध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे तुमची त्वचा आणि केसांना पोषण देण्याबरोबरच थंडीच्या प्रभावापासून संरक्षण करतात.

या बिया त्वचा चमकदार आणि केस ठेवतील मजबूत, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
seeds
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिवाळा सुरु झाली की या थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. या ऋतूत वातावरणात थंड हवा असल्याने आणि कमी आर्द्रता यामुळे त्वचा निर्जीव दिसते. त्याच बरोबर त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो आणि केस कोरडे होतात. त्वचा आणि केस दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी आतून पोषणाची ही गरज असते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या बियांचे समावेश करून त्यांचे नियमित सेवन करा.

न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल म्हणतात की, हिवाळ्याचा दिवसांमध्ये वातावरणातील बदलते हवामान आणि कमी आर्द्रता तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चॅलेंजिंग असू शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे की या बियांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात रोजच्या आहारात या बियांचे सेवा केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल.

कोणत्या बियांचे करावे सेवन?

न्यूट्रिशनिस्ट यांच्या नुसार तुम्ही केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही अळशीच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. मात्र या बियांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. हंगामी फळांबरोबर तुम्ही दररोज 5 ग्रॅम किंवा एक चमचा या बियांचे सेवन करु शकता. लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध खात असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता या बियांच्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि फायबर समृद्ध असतात. या बियांच्या सेवनाने तुमचे केस मजबूत करण्यास आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. अळशीचे बियाणे त्वचेत कोलेजेनचे उत्पादन देखील वाढवतात. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये अळशीच्या बिया रोज खाल्ल्याने केसगळतीपासूनही मुक्ती मिळेल.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ईचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत.या बिया त्वचेसाठी अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतात. सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. तसेच या बियांमध्ये असलेले झिंक आणि सेलेनियम देखील असते, जे केसांना मजबूत करतात.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तुम्ही नियमित या बियांचे योग्य प्रमाणत सेवन केल्यास केसांच्या वाढीस चालना मिळते. तसेच यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई आणि झिंक त्वचा सुधारण्याबरोबर त्वचेचे अकाली वृद्धत्व देखील रोखतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)