नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : आपल्या आहाराचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे डॉक्टरांपासून ते अनेक तज्ज्ञ आपल्या हेल्दी डायट घ्यायला सांगत असतात. अलिकडे आपली जीवनशैली बदलत चालली आहे. त्यामुळे आपल्या आहारावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक जण फास्ट फूड्स खाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यात ट्रांस फॅट आणि आर्टीफिशिय शुगर मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीरासाठी हे अन्नपदार्थ धोकादायक आहेत. या अन्नपदार्थाने लिव्हर म्हणजेच यकृतात फॅट जमा होऊ लागते. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उत्पन्न होते. त्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ आपण टाळायला हवेत ते पाहूयात…
धावपळीच्या युगात फिट आणि फाईन राहण्यासाठी आपल्याला कोणते पदार्थांची शरीराला गरज आहे. कोणते पदार्थ हानिकारक आहेत. हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे काही अन्नपदार्थांना आपण टाळायला हवे. कारण या पदार्थांच्या आहारातील समावेशाने आपल्याला दारु पेक्षाही जास्त नुकसान पोहचू शकते. तर हे पदार्थ कोणते ते पाहूयात…
जर तुम्हाला तुमच्या लिव्हरला हेल्दी राखायचे आहे. तर प्रोसेस्ड कार्ब्स पदार्थांना आपल्या आहारातून त्वरीत हद्दपार करा. हे पदार्थ तुमच्या लिव्हरसाठी खूपच हानिकारक आहेत. कारण प्रोसेस्ड कार्ब्स प्रोसेस्ड फूड आयटमच्या कॅटगरीत मोडतात. यात सोडीयमचे प्रमाण जादा असते. आणि सेच्युरेटेड फॅटचे प्रमाण देखील मोठे असते.
मीठ आपल्या शरीराला धोकादायक आहे. तुम्ही जितके मिठाचे प्रमाण कमी कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढते. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने देखील सावध केले आहे. मीठाचे पदार्थ तुमच्या लिव्हरच्या आरोग्यासाठी खूपच वाईट आहेत. जास्त सोडीयममुळे हाय ब्लड प्रेशरला आमंत्रण मिळते. हृदय विकाराचे प्रमाण वाढते आणि स्ट्रोकला निमंत्रण मिळू शकते. तसेच लिव्हरसाठी देखील सोडीयम हानिकारक असते. त्यामुळे मिठाचे पदार्थ खाणे आत्ताच्या आत्ता बंद करुन टाका. वेफर्स, चिवडा, यात मिठाचे प्रमाण जादा असते. पाकिटबंद अन्नपदार्थात देखील मिठाचे प्रमाण जास्त असते.
सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय आजकाल तरुणांपासून म्हाताऱ्यांनाही असते. जर तुम्हालाही सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय लागली असेल तर आत्ताच्या आत्ता बंद करुन टाका. जे लोक जास्त सॉफ्ट ड्रिंक्स पित असतील तर त्यांना नॉन- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ( एनएएफएलडी ) होण्याचा धोका जादा असतो.
शुगरी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जादा असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या शुगरी ड्रिंक्स प्यायल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. ज्यामुळे इंसुलिन रेजिस्टेंस होऊ शकते.
एसिटामिनोफेन तसे सुरक्षित मानले जाते. परंतू जेव्हा त्याचा दुरुपयोग किंवा जादा वापर केला जातो. तेव्हा टॉक्सिसिटीचे कारण बनू शकते. यामुळे देखील तुमचे लिव्हर डॅमेज होऊ शकते. Acetaminophen एसिटामिनोफेन म्हणजे पॅरासिटेमॉल. पेन किलर म्हणून त्याचा वापर केला जातो.