Year Ender 2022: ‘या’ वर्षात हे पदार्थ होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या फायदे

| Updated on: Dec 13, 2022 | 1:08 PM

तुम्ही आहारात अशा अनेक सुपरफूड्सचा समावेश करू शकता जे पोषक तत्वांनी युक्त असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात.

Year Ender 2022: या वर्षात हे पदार्थ होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या फायदे
Follow us on

नवी दिल्ली – लवकरच हे वर्ष संपून नव्या वर्षाची सुरूवात होईल. आजकालचे व्यस्त जीवन आणि खराब जीवनशैली यामुळे लोक त्यांच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. अशा वेळी नियमित व्यायाम पौष्टिक व सकस आहार (healthy food diet) घेणेही खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आहारात अशा अनेक सुपरफूड्सचा (superfoods) समावेश करू शकता जे पोषक तत्वांनी युक्त असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात. हे पदार्थ आरोग्याशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी काम करतात. तसेच त्यांचे सेवन केल्याने तुम्ही निरोगीही राहता. असे अनेक सुपरफूड यावर्षी ट्रेंडमध्ये (superfood in trend) आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? येथे काही सुपरफूड आहेत.

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळ्याचे सेवन केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही आवळ्याचा ज्यूसही पिऊ शकता. त्यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. आवळा खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तसेच आवळ्याचे नियमितपणे सेवन केल्यास केस वेगाने वाढतात.

हे सुद्धा वाचा

हळद

हळदीचा भारतीय स्वयंपाकघरातील व जेवणातील वापर लोकप्रिय आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, तसेच कर्क्यूमिन तत्वही असते. हळदीचा वापर केवळ स्वयंपाकासाठी नव्हे तर त्वचेसाठी, सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

ॲवकॅडो

ॲवकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स, खनिजे, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. त्याचे सेवन केल्याने जळजळ, मधुमेह आणि हृदयरोग इत्यादी समस्यांपासून दूर राहतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात या भाज्यांचे सेवन केल्याने आपले शरीर ऊर्जावान राहते.

सुका मेवा

सुक्या मेवा हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतो. त्यामध्ये लोह, पोटॅशिअम, मॅंगनीज, फॉस्फरस आणि झिंक यांसारखे पोषक घटक असतात. शेंगदाणे, काजू, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याचा आहारात समावेश केला पाहिजे.

शुद्ध देशी तूप

शुद्ध देशी तूप अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरले जाते. तुम्ही रोज 1 ते 2 चमचे तूप पोळी, भाकरी किंवा भातावर घेऊन खाऊ शकता. हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

बेरीज

स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीसारखी फळं ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेषतः महिलांसाठी त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यातील पोषक तत्त्वे स्तन आणि पोटाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.

तुळस

हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्व असते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पानांचा चहा किंवा काढा प्यायल्याने सर्दी, खोकला इत्यादींपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)