मुंबई : कोरोना काळानंतर वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी ट्राव्हेलिंगच्या सुविधा कमी झाली. घरून काम करताना कर्मचा कामाचा लोड असेल तर ड्युटीपेक्षा जास्त वेळही काम करतात. याचा कंपनीलाच फायदा होतो. मात्र काम करताना किंवा घरी लॅपटॉपवर काम करताना अनेकजण मांडीवर घेऊन काम करतात. परंतु अशा प्रकारे लॅपटॉप घेतल्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. आरोग्यावर नेमका काय परिणाम जाणून घ्या.
मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने क्षणभर आराम मिळतो. पण दोन मिनिटांच्या आरामामुळे आरोग्यावर त्याचा किती परिणाम होतो याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसावी. लॅपटॉप पायावर म्हणजेच मांडीवर ठेवल्यावर गरम झाला की त्यामधूम जी गरम हव बाहेर येते त्याचा त्वचेवर परिणाम होतो. काही वेळानंतर तुमच्या स्किनची जळजळ होऊ शकते. याला टोस्टेन स्किन सिंड्रोंम असे म्हणतात.
पुरूषांच्या प्रजननक्षमतेवरही या गरम हवेचा परिणाम होऊ शकते. या गरम हवेमुळे शरीरातील शुक्राणूंची संख्या आणि त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरूषांनी जितकं टाळता येईल तितकं हे टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच मांडीवर लॅपटॉप ठेवून जास्त वेळ काम केल्याने तुमची पाठ दुखू शकते. याचा कोणताही ठोस असा पुरावा नाही पण सर्वसाधारण आणि ऐकिव माहिनुसार या गरम हवेचा पुरूषांवर अशा पद्धतीने परिणाम होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीने काम करण्याची सवय असेल तर वेळीच सुधारा.
लॅपटॉपवर जास्त वेळ काम असेल तर आपल्या उंचीला अनुसरून टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करावं. काम करत असताना वीस ते तीस मिनिटांनी छोटासा ब्रेक घ्यावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्याचंही आरोग्य व्यवस्थित राहतं. लॅपटॉपवर आठ-आठ तास काम करत असाल तर सकाळी उठल्यावर कमीत-कमी पाच सूर्यनमस्कार तरी करा.