Thyroid Diet : थायरॉईड ही आपल्या शरीरातील अतिशय महत्वाची ग्रंथी (thyroid) आहे, ज्यातून थायरॉक्सिन हार्मोन (hormone) निघतं. हे इतकं महत्वाचं हार्मोन आहे की ते कमी झाल्यास किंवा वाढल्यास, जास्त झाल्यास, दोन्ही परिस्थितीत त्रास होऊ शकतो. थायरॉईडची समस्या असल्यास स्नायूंमध्ये खूप वेदना होतात. यामुळे सांधेदुखी, जॉईंट पेन, ड्राय स्किन, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अशा परिस्थितीत तुम्हाला खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण काही पदार्थांच्या सेवनाने थायरॉईडचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर काही पदार्थांचे सेवन टाळणे उत्तम ठरते.
थायरॉईडच्या रुग्णांनी या पदार्थांचे सेवन करू नये.
फायबरयुक्त भाज्या
ज्या भाज्यांमध्ये जास्त फायबर असते अशा भाज्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. पण थायरॉईडच्या रुग्णांनी फायबर युक्त भाज्यांचे सेवन करू नये हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यांचे सेवन केल्याने थायरॉईडची समस्या वाढू शकते, तसेच पोटाशी संबंधित त्रासही होऊ शकतो. म्हणूनच बीन्स, तंतुमय भाज्या खाणे टाळावे.
सोया
जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर सोया प्रॉडक्ट्सचे चुकूनही सेवन करू नका. कारण याचे सेवन केल्याने थायरॉइडची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सोयायुक्त पदार्थ गोष्टी खाणे टाळा.
प्रोसेस्ड फूड
थायरॉईडचा त्रास असेल तर प्रोसेस्ड फूडही खाणे टाळावे. कारण त्यामुळे थायरॉईडचा त्रास आणखीनच वाढू शकतो.
ग्लूटेन प्रोटीन
ज्यामध्ये ग्लूटेन प्रोटीन अशा पदार्थांचे थायरॉईडच्या रुग्णांनी कधीच सेवन करू नये असते. कारण ग्लूटेन थायरॉईड औषधाला तटस्थ करते, ज्यामुळे समस्या वाढू शकते. म्हणूनच ब्रेड, बर्गर, केक, कँडी यांसारखे ग्लूटेनयुक्त पदार्थ खाणे टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)