नवी दिल्ली – थंडीचे दिवस (winter) हे सर्वांनाच आवडत असेल तरी त्यासोबतच अनेक समस्या आणि आजारही (disease) येतात. वातावरणातील गारवा तसेच धूळ, प्रदूषण यामुळे सर्दी, खोकला, ताप हे आजार (cough, cold, flu)होणे सामान्य झाले आहे. मात्र थंडीचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींवर होतो. एका अभ्यासानुसार, हिवाळ्यात वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. वृद्ध व्यक्ती, विशेषत: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, या तरुण व्यक्तींपेक्षा थंडीतील तापमान सहन करण्यास कमी सक्षम असतात. थंड तापमानाचा संपर्क आणि थर्मोरेग्युलेशन बिघडल्याने त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते, ज्याचा वृद्धांवर थेट परिणाम होतो. शीत लहरींमुळे त्यांनाही सर्दी, ताप, खोकला, न्युमोनिया यांसारखे आजार होऊ शकतात.
थंडीच्या दिवसांत वृद्धांची विशेष काळजी घेऊन चत्यांना आजारी पडण्यापासून वाचवले पाहिजे. त्यासाठी काही उपाय करणे शक्य आहे.
– थंडीपासून बचाव करण्यासाठी वृद्धांना थर्मल, स्वेटर, पायमोजे, कानटोपी यांसारखे कपडे व्यवस्थित घालावेत. हीटिंग उपकरणांच्या सहाय्याने त्यांची खोली उबदार ठेवावी.
– वृद्धांनी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करावा. थंडीच्या दिवसांत बहुतांश लोक हे ब्लॅंकेटमध्ये घुसून आराम करणे पसंत करतात आणि शारीरिक व्यायाम बिलकूल करत नाहीत. त्यामुळे हाडांची झीज होते. घरामध्ये साधे व्यायाम करून हाडांची झीज टाळू शकतो.
– हायड्रेटेड रहावे. थंडीच्या वातावरणात अनेकदा कमी तहान लागते आणि लोक कमी पाणी पिऊ लागतात. वृद्ध लोक देखील यावेळी कमी द्रव पितात. ते पुरेसे द्रवपदार्थ किंवा पाणी पीत आहेत याची खात्री करा.
– पायात मोजे, शूज घालून ते झाकलेले ठेवावेत. वृद्धांच्या पायात मोजे व चप्पल किंवा शूज घालावे. चालताना ते पडणार नाहीत याची कालजी घ्यावी , अथवा त्यांना सांध्यांना, मणक्याला दुखापत होऊ शकते. जेणेकरून ते पडू नये.
– वृद्ध व्यक्तींशी नियमितपणे बोलत रहा, संवाद ठेवा. यामुळे ते हिवाळ्यात येणारे नैराश्य अथवा डिप्रेशनपासून वाचू शकतील.
– वृद्ध व्यक्तींना पौष्टिक व सकस आहार द्यावा. चांगले आरोग्य राखण्यासाठी, त्यांना व्हिटॅमिन डी समृद्ध आहार द्यावा. तसेच वृद्धांनी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसावे.