पोषणाचे पॉवरहाऊस असलेल्या चण्याचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे

| Updated on: Jan 03, 2025 | 5:15 PM

ज्यांना हेल्दी डाएट हवा आहे त्यांच्यासाठी मोड आलेले चणे हा उत्तम पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया हे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला काय फायदे होऊ शकतात.

पोषणाचे पॉवरहाऊस असलेल्या चण्याचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
sprouted gram
Follow us on

हिवाळाच्या दिवसात आपण प्रत्येकजण आहारात हेल्दी डाएट घेत असतो. तसेच असे बरेचजण आहेत जे नेहमी हेल्दी डाएट करत असतात. कारण हेल्दी डाएट तुमचे आरोग्य तंदरुस्त ठेवते. यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात हेल्दी डाएटचा समावेश करण्यासाठी मोड आलेले चणे यांचा समावेश करू शकतात. कारण मोड आलेल्या चण्यांना पोषणाचे पॉवरहाऊस म्हटले तर ते कदाचित चुकीचे ठरणार नाही. कारण आरोग्यविषयक फायद्यांमुळे हा आहारतज्ञांचा आवडता आहार मानला जातो. खरे तर मोड आलेल्या चण्याचे पोषणमूल्य वाढते. तुम्ही या मोड आलेल्या चण्यांची मस्त चमचमीत मीठ आणि कांद्यासोबत भेळ बनवून खाल्यास तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. ज्याने तुम्हाला कोणत्याच आजाराचा सामना करावा लागणार नाही. याकरिता मोड आलेले चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊयात.

मोड आलेले चणे खाण्याचे फायदे

१. पोषक द्रव्यांचे शोषण वाढेल

तुम्ही या मोड आलेल्या चण्याचे आहारात समावेश करवून याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक द्रव्यांची जैवउपलब्धता वाढवतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला लोह, कॅल्शियम आणि बी जीवनसत्त्वे यासारख्या खनिजे आणि जीवनसत्त्वे शोषून घेण्यास मदत होते.

२. पचनक्रिया चांगली होईल

आपल्या शरीरात काही खानपानाच्या प्रक्रियेमुळे फायटिक ॲसिडसारखे घटक कमी होतात, ज्यामुळे अन्नातील खनिजे शोषणात अडथळा आणू शकतात आणि पाचक अस्वस्थता वाढवू शकतात.तर अशा समस्या न होण्यासाठी तुम्ही मोड आलेले चणे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.

३. फायबर समृद्ध

मोड आलेले चणे हे आहारातील फायबरचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहेत, याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास तुमचे पाचक आरोग्य सुधारते तसेच निरोगी मार्गाने आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहित करते.

४. प्रथिने समृद्ध

मोड आलेले कडधान्य हे प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे, परंतु मोड आलेले चणे त्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा एक चांगला आहार बनतो.

5. अमिनो ॲसिड समृद्ध

अंकुरित चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात आवश्यक अमिनो ॲसिड असतात, जे शरीराला मजबूत करतात आणि स्नायूंची दुरुस्ती करतात.

६. कमी ग्लाइसेमिक इंडेक्स

मोड न आलेल्या चण्यांमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ असा आहे की यामुळे मोड आलेले चण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि टाइप -2 मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा फायदा होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)