आता झोपेच्या समस्यांना म्हणा Goodbye! हे उपाय ठरतील प्रभावी

| Updated on: Dec 17, 2022 | 2:45 PM

निरोगी आयुष्यासाठी चांगली व शांत झोप अतिशय महत्वाची ठरते. मात्र झोप न येण्याच्या त्रासामुळे इन्सोमेनिया आणि डिप्रेशन सारख्या समस्याही उद्भवू शकतात.

आता झोपेच्या समस्यांना म्हणा Goodbye! हे उपाय ठरतील प्रभावी
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – झोप (sleep) ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (mental health) परिणाम होतो. चांगली, शांत व गाढ झोप मिळाली नाही तर त्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार (negative thoughts) येऊ लागतात, तसेच चिडचिड होणे व डोकेदुखी असा त्रासही होतो. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार जितका महत्वाचा आहे, तितकीच महत्वाची ठरते चांगली आणि पुरेशी झोप.

खराब जीवनशैली आणि जास्त ताण हे निद्रानाशाचे कारण असू शकते. त्याच वेळी, काही लोकांना तीव्र वेदना, नैराश्य आणि औषध यामुळे नीट झोप नाही. मात्र या त्रासांवर व्यवस्थित व योग्य उपचार केले तर झोपेची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच आपल्या जीवनशैलीत काही बदल करून झोपेची पद्धतही बदलता येते. चांगली झोप येण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकतो.

झोपण्याची एक वेळ निश्चित करावी

हे सुद्धा वाचा

झोपेचे वेळापत्रक बदलले किंवा झोपेचा पॅटर्न बदलला तरी झोपेवर परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने नेहमीचे रूटीन किंवा वेळापत्रक पाळत झोप घेतली तर त्या व्यक्तीला चांगली झोप लागू शकते. तसेच, झोप सुधारुही शकते. या स्थितीला सोशल जेट लॅग म्हणतात. लवकर किंवा उशिरा झोपल्याने झोप खराब होते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एका ठराविक वेळी झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

काही क्षण शांततेत घालवा

रोज झोपायला जाण्यापूर्वी काही वेळ शांततेत घालवला तर चांगली झोप लागू शकते तसेच झोप वाढूही शकते. झोपायला जाण्याच्या अर्धा ते एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही पाहू नका. थोडा वेळ पुस्तकं वाचावीत. गरम पाण्याने अंघोळ करावी किंवा हर्बल चहा प्यावा.

लक्ष विचलित करावे

जर तुम्हाला झोप येत नसेल तर स्वतःचे लक्ष विचलित करा. तुम्हाला आनंद वाटेल असे काही करावे. उदा- आवडीचे पुस्तक वाचणे, योगासने करणे किंवा विणकाम अथवा पेटिंग करणे. यामुळे चांगली व शांत झोप लागू शकते. रात्री लॅपटॉप वर काम, बिल भरणे किंवा घरचे काम करणे टाळा.

आराम करावा

मेडिटेशन आणि मसल रिलॅक्सेशन यांसारख्या तंत्रांचा सराव केल्यानेही चांगली झोप लागू शकते. यामुळे मन आणि स्नायू शांत होतात. तणाव आणि चिंता दूर केल्यानेही चांगली झोप लागते. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक मानसिक समस्या वाढू शकतात. चांगली झोप हवी असेल तर जीवनशैली आणि सवयी यांमध्ये बदल करण्याची गरज असते.