नवी दिल्ली – ॲसिड रिफ्लेक्समुळे घशात जळजळ (burning throat) होते, परंतु त्याशिवाय, धूम्रपान, ॲलर्जी, सर्दी, व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या (bacteria) संसर्गामुळे देखील घशात जळजळ होऊ शकते. घशात जळजळ होत असल्यास, बोलण्यासोबतच खातानाही त्रास होतो. काहीवेळा लोकांना अनेक आठवडे त्याचा त्रास होतो. औषधे घेतल्याने त्यापासून आराम मिळू शकतो. पण काही काही घरगुती उपायांच्या (home remedies) मदतीने देखील तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
घशातील जळजळ थांबवण्याचे उपाय
1) नारळ पाणी
घशाच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी नारळाचे पाणी प्या कारण त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. खाल्ल्यानंतर घशात जळजळ होत असेल तर सामान्य पाणी पिण्याऐवजी अर्ध्या तासानंतर नारळाचे पाणी प्या.
2) मध
घशातील जळजळ थांबवायची असेल तर मधाचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर आहे. मधातील अँटी-बॅक्टेरिअल घटक घशात जळजळ होण्याच्या समस्येपासून त्वरित आराम देते. त्यामुळे कोमट पाण्यात मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करून प्या.
3) मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात
घशात खूप जळजळ होत असेल तर मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हेदेखील खूप फायदेशीर ठरेल. यासाठी एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ घालून त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुळण्या कराव्यात. याने खूप आराम मिळेल.
4) हळद
हळदीचे सेवन केल्यानेही घशातील जळजळीपासून आराम मिळू शकतो. हे खूप प्रभावी ठरते. हळदीमध्ये कर्क्युमिन तत्व असते, जे अँटी-इनफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल असते. त्यामुळे हळदीच्या सेवनाने या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. फक्त एक चमचा हळद पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.