नवी दिल्ली : युरिक ॲसिड (Uric Acid) हे आपल्या शरीरात बनणारे एक केमिकल आहे, जे शरीरात प्यूरिन नावाच्या केमिकलच्या विघटनाने तयार होते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले तर अनेक गंभीर आजारांचा (harmful) धोकाही वाढू शकतो. म्हणूनच ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांमध्ये युरिक ॲसिडचा सामान्य स्तर 3.5 ते 6 mg/dL इतका असतो. तर पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची नॉर्मल लेव्हल 4 ते 6.5 mg/dL यइतकी मानली जाते. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी सामान्य स्तरापेक्षा वाढते, तेव्हा ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होते. त्यामुळे सांध्यामध्येही वेदना (joint pain) होतात. तुमच्या शरीरातही युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले असेल आणि तुम्हाला ते औषधांनी नव्हे तर नैसर्गिकरित्या नियंत्रित करायचे असेल, तर काही नैसर्गिक उपाय हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खावेत
वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे प्रमाण वाढवा. संत्री, लिंबू, आवळा आणि इतर लिंबूवर्गीय रसाळ फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी समृध्द पदार्थांचे सेवन केल्याने गाउटचा धोकाही कमी होतो.
गोड पदार्थ खाणे टाळा
खूप गोड पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढू शकते, त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या आहारातून वगळल्यास बरे होईल. गोड पदार्थांमध्ये केवळ मिठाईचाच समावेश नाही, तर कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटबंद पदार्थही टाळावेत.
ॲपल सायडर व्हिनेगरची मदत घ्या
ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन करा. त्याने बराच फायदा होईल.
पुरेसे पाणी प्या
जर तुमच्या शरीरातील युरिक ॲसिड जास्त असेल तर दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी सक्रिय राहते आणि शरीरातून युरिक ॲसिड बाहेर पडते.
मद्यपान टाळा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने देखील शरीरातील युरिक ॲसिड वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवायचे असेल तर आधी दारू पिणे बंद करावे.
वजन नियंत्रणात ठेवा
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांना स्थान द्या. यामुळे वजन नियंत्रित राहते तसेच युरिक ॲसिडही नियंत्रणात राहते.