Dry Cough : कोरड्या खोकल्याने उडवल्ये रात्रीची झोप ? अहो, मग हे उपाय करून तर पहा

| Updated on: Mar 09, 2023 | 3:29 PM

जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर तुम्ही ज्येष्ठमधाचे सेवन करू शकता.

Dry Cough : कोरड्या खोकल्याने उडवल्ये रात्रीची झोप ? अहो, मग हे उपाय करून तर पहा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : बदलत्या ऋतूमानानुसार, सर्दी, खोकला, कफ (cough) यांचा धोका वाढतो. या ऋतूत तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी आरोग्य तज्ज्ञ आपल्याला बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्या (fruits and vegetables) खाण्याचा सल्ला देतात. त्याच वेळी, आजारपणाच्या बाबतीत, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आयुर्वेदिक गोष्टी खाण्याची शिफारस केली जाते. कोरडा खोकला अतिशय त्रासदायक असतो. त्यामुळे रात्र-रात्र झोपही लागत नाही. जर तुम्हालाही कोरड्या खोकल्याचा (dry cough) त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर तुम्ही खाली नमूद केलेल्या काही गोष्टींचे सेवन करू शकता.

ज्येष्ठमध

जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर तुम्ही ज्येष्ठमध सेवन करू शकता. याच्या वापराने कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा तोंडात ठेवून चघळू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही चहामध्ये ज्येष्ठमधाची काडी घालून सेवन करू शकता. दिवसातून 2-3 वेळा याचा वापर केल्यास लवकर परिणाम मिळतात. मात्र गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी ज्येष्ठमध सेवन करू नये. ज्येष्ठमधाची पावडर मधात घोळवून त्याचे चाटणही सेवन करू शकता.

हे सुद्धा वाचा

तुळस

तुलस ही अतिशय औषधी असते. त्यामधील अनेक गुणधर्म खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन देखील करू शकता. याच्या सेवनाने कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. यासाठी तुळशीची काही पाने पाण्यात उकळून चहाप्रमाणे सेवन करू शकता. तुळशीचा चहा दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. किंवा तुम्ही तुळशीचा काढा तयार करून त्याचेही सेवन करू शकता.त

लसूण

कोरड्या खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लसणाचे सेवन देखील करू शकता. यासाठी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या दुधात चांगल्या प्रकारे उकळा. यानंतर दुधात चिमूटभर हळद मिसळून सेवन करा. यामुळे कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

आलं आणि मध

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि सर्दीमध्ये फायदेशीर असतात. त्याच वेळी, मध हा हंगामी रोगांसाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळा. त्यात एक चमचा मध मिसळून सेवन करा. दिवसातून दोनदा आल्याचे पाणी प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)