वजन कमी करायचंय ? सर्वात आधी सकाळच्या या सवयी बदला

| Updated on: Mar 08, 2023 | 4:00 PM

आपल्या सकाळच्या काही सवयी जाणूनबुजून किंवा नकळतपणे वजन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

वजन कमी करायचंय ? सर्वात आधी सकाळच्या या सवयी बदला
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : सामान्यतः खाण्यापिण्यात निष्काळजीपणा आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली (unhealthy lifestyle) हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण मानले जाते. पण आपल्या रोजच्या काही सवयी अशाही असतात, ज्या दूर केल्याने वजन वाढणे तर कमी होतेच, पण वजन (खरोखर) कमीही (weight loss) होऊ लगाते. चांगल्या दिवसासाठी चांगली सुरुवात होणं गरजेचं आहे, हे तर तुम्हीही मानत असाल ना ! विशेषत: सकाळी आरोग्यदायी सवयी अवलंबल्या नाहीत तर आपली तब्येत बिघडायला वेळ लागत नाही आणि वजनही झपाट्याने वाढू (weight gain) लागते.

या खूप सोप्या सवयी आहेत आणि त्या तुमच्या दिनक्रमात समाविष्ट करणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सकाळच्या कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या (चांगल्या) सवयी अंगीकारल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

सकाळी लवकर उठणे

हे सुद्धा वाचा

उत्तम आरोग्यासाठी रोज 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे यात काहीच शंका नाही. पण जास्त झोपणे हेही तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. एवढचं नव्हे तर सकाळी उशिरा उठण्याची सवयही चांगली नाही. जर तुम्ही उशीरापर्यंत झोपून राहिलात, तर तुमचा नाश्ता उशिरा होतो आणि याचा तुमच्या मेटाबॉलिज्मवरही परिणाम होईल आणि वजन वाढेल. एका संशोधनानुसार, जे लोक नऊ ते 10 तास झोपतात ते 7 ते 8 तास झोपलेल्या लोकांपेक्षा 21 टक्के जास्त लठ्ठ असतात. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. यामुळे, मेटाबॉलिज्म रेट सामान्य राहतील आणि चरबी साठणार नाही.

सकाळी पाणी प्यावे

आपल्या शरीरातील प्रत्येक जैविक क्रियेसाठी पाणी आवश्यक आहे. हे कोलन फ्लश करण्यापासून चांगले मेटाबॉलिज्म होण्यासाठी मदत करते. तसेच शरीराला अधिक कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते. कमी पाणी प्यायल्याने निर्जलीकरण आणि मेटाबॉलिज्म मंद होऊ शकतो. म्हणूनच सकाळी एक ते दोन ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. तसेच, तुमच्या दैनंदिन क्रियांनुसार, शरीर चांगले हायड्रेटेड ठेवा. वजन कमी करण्यासाठी हे सर्वात उपयुक्त ठरते.

योग्य पद्धतीने नाश्ता करणे

आपल्या शरीरासाठी नाश्ता सर्वात महत्वाचा आहे. तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर नाश्त्यासाठी योग्य पदार्थांची निवड करणे खूप महत्वाचे आहे. उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता तुम्हाला दिवसभर ऊर्जा देईल आणि जंक फूड खाण्याची गरज भासणार नाही. यासोबतच सकाळी शरीरातील सर्व पोषक तत्वे पचवण्याची क्षमता चांगली राहते. यामुळे शरीर निरोगी राहते आणि तुम्हाला उत्साही वाटते.

साखरेचा वापर

बहुतेक संशोधनात हे समोर आले आहे की साखरेच्या वापरामुळे आपले वजन वाढू शकते. तसेच ब्लड शुगरची समस्या देखील होऊ शकते. सकाळी जास्त साखर असलेला चहा किंवा कॉफी पिणे हे तुमचे वजन वाढवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अनेक वेळा लोक सकाळी अनेक कप चहा किंवा कॉफी पितात. त्यात चहा आणि कॉफीपेक्षा जास्त हानिकारक साखर असते. अशा परिस्थितीत वजन कमी करायचे असेल तर कॉफीमध्ये कमी साखर घाला किंवा सकाळी हर्बल चहा पिण्याची सवय लावा.

जेवणावर लक्ष केंद्रित करा

साधारणपणे, आपण खाणे हे सर्वात सोपे काम मानतो आणि त्यावर जास्त वेळ घालवू इच्छित नाही. पण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्यामुळे आपण किती आणि कोणते पदार्थ खातोय हे कळत नाही. त्यामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर अन्न नीट चावून खाण्याकडेही आपले लक्ष नसते आणि त्यामुळे अपचन होऊ शकते, तसेच वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सावकाश आणि मन लावून खा. तसेच, प्रत्येत घास नीट चावून खा.