Health : डायबिटीसचा त्रास असणाऱ्यांनी आहारामध्ये ‘या’ भाजीचा करा समावेश, जाणून घ्या!

| Updated on: Sep 21, 2023 | 8:55 PM

डायबिटीसमध्ये आहाराची देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण डायबेटीस पेशंटच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू नये यासाठी काही मोजके आणि पौष्टिक पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. त्यात डायबिटीस पेशंटसाठी हिरव्या भाज्या खाणे खूप गरजेचे असते.

Health : डायबिटीसचा त्रास असणाऱ्यांनी आहारामध्ये या भाजीचा करा समावेश, जाणून घ्या!
Follow us on

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास  होताना दिसत आहे. टेन्शन, अनुवंशिकता, सध्याचे बदलते वातावरण, तणाव अशा अनेक गोष्टींमुळे डायबिटीसची आजार उद्भवत आहे. तर तुम्हाला देखील डायबिटीसचा त्रास असेल तर स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.  यावर एक ही भाजी तर डायबिटीज पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे. जी खाल्ल्यामुळे डायबिटीस पेशंटला शुगर कंट्रोलमध्ये आणण्यास मदत होते. तर आता आपण या भाजीचे फायदे जाणून घेणार आहोत ज्याचा उपयोग डायबिटीस पेशंटला नक्कीच होईल.

कोणती आहे ती भाजी?

दोडका हा डायबिटीस पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतो. कारण दोडक्यामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते जे भूक नियंत्रणात आणण्यास मदत करते. तसेच दोडका आपले वजन देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. दोडक्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. दोडका डायबिटीस पेशंटच्या रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवतो. तसेच तो चयापचय इन्सुलिन उत्तेजित करते. दोडक्यामध्ये हायपोग्लासेमिक गुणधर्म आहेत जे डायबेटिस पेशंटला खूप फायदेशीर ठरतात.

दोडका ही अशी भाजी आहे ज्यामध्ये कॅलरीचे प्रमाण आणि कार्बोदकाचे प्रमाण कमी प्रमाणात असते. त्यामुळे दोडक्या हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरतो. डायबिटीच्या पेशंटने त्यांच्या आहारात दोडक्याचा समावेश केला तर त्यांची रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच दोडका हा आपल्या इन्सुलिनचे उत्पादन सुधारण्यास मदत करते.

डायबिटीस पेशंटसाठी दोडका हा खूप पौष्टिक असतो. त्यामुळे डायबिटीज पेशंटने त्यांच्या आहारात नियमित दोडक्याचा समावेश केलाच पाहिजे. दोडक्यामध्ये पेप्टाइड्स मोठ्या प्रमाणात असतात जे शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करतात. दोडक्यामुळे डायबिटीस पेशंटची शुगर लेवल नियंत्रणात राहते. डायबिटीस पेशंटने त्यांच्या आहारात दोडक्याचा समावेश करताना दोडक्याची भाजी, दोडक्याची चटणी अशा पद्धतीने समावेश करू शकता.