कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम

| Updated on: Jan 01, 2025 | 7:27 PM

कॉफीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु आजकाल सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड प्रचंड व्हायरल होतांना दिसतोय. यामध्ये कोल्ड ड्रिंकमध्ये प्रोटीन शेक मिक्स करतात आणि त्याचे सेवन करतात. परंतु, कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेकचे सेवन एकत्र केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेकचे एकत्र सेवन केल्यास काय होईल.

कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम
cold drinks
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आजकाल सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल झालेल्या ट्रेंडमध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये प्रोटीन शेक मिक्स केले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का या पेयाचे सावन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, कोल्ड ड्रिंक्सच्या आणि प्रोटीन शेकच्या सेवनामुळे तुम्हाला पोटा संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. कोल्ड ड्रिंकमध्ये भरपूर प्रमाणात सोडा असतो ज्यामुळे तुम्हाला अपचन आणि पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. प्रोटिन शेकचे सेवन तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. प्रोटिन शेकचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोनल बदल होण्यास मदत होते.

तज्ञांनुसार, कोल्ड ड्रिंक्स आणि प्रोटीन शेक मिक्स करून प्यायल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीत त्रास होतो. कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात कार्बनडायऑक्साईड असते ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत अनेक समसस्या उद्भवतात. त्यासोबतच कोल्ड ड्रिंक आणि प्रोटिन शेक यांचे एकत्र सेवन केल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि मळमळ यांच्यया सारख्या समस्या उद्भवतात. कोल्ड ड्रिंकमध्ये भरपूर प्रमाणात कृत्रिम स्वीटनर आढळतात ज्यामुळे तुम्हाला पोटाचा अलसर किंवा विकार होण्याची शक्यता असते.

लहान मुलांनो सावधान

कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेलं कार्बोनेशन आणि कॉफीमधील कॅफीन तुमची पचनसंस्था बिघडते आणि त्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत आजार होऊ शकतात. कोल्ड ड्रिंक्सचे सेवन तुमच्या लहानमुलांसाठी देखील घातक ठरू शकतात. अनेकवेळा लहानमुलांमध्ये कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे अनेक पोटासंबंधीत समस्या दिसून येतात. त्यामुळे तुमच्या लहानमुलांना जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करूनन देऊ नये. तसेच जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन जमा होते ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नाही आणि अनेकवेळा मळमळ होते.

प्रोटिन शेक कसा प्यावा?

प्रोटिन शेक नेहमी पाण्यासोबत प्यावा. अनेकजण प्रोटिन शेकचे सेवन दुधासोबत देखील करतात. प्रोटिन शेकचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रोटिन योग्य प्रमाणात शोषले जाते. त्यासोबतच प्रोटिन शेकमुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते त्यासोबतच तुमच्या शरीराला पोषण मिळण्यास मदत होते.