जीवनसत्व ‘अ’ची आपल्या शरीराला खूपच गरज असते. शरीराचा आजारापासून आणि इन्फेक्शन पासून नैसर्गिकरित्या बचाव करण्याचे काम विटामिन्स ‘अ’ करीत असते. डोळ्याची दृष्टी सुधारण्याचे काम देखील या जीवनसत्वामुळे होत असते. ‘अ’ जीवन सत्व मिळल्याने महिलांना अधिक फायदेशीर ठरते. त्वचेचे आरोग्य चांगले रहाते. तुमच्या रोजच्या आहारातूनच तुम्ही विटामिन्स A मिळवू शकता.चला तर पाहूयात कोणत्या पदार्थांत विटामिन्स A आढळते ?
पुरुषांना दिवसाला 700µg मायक्रो ग्रॅम
महिलांना दिवसाला 600µg मायक्रो ग्रॅम
तुम्हाला आवश्यक असणारे विटामिन्स A ची गरज तुमच्या रोजच्या डाएटमधून मिळू शकते. तुमच्या शरीराला आवश्यक नसलेले कोणतेही जीवनसत्व भविष्यातील वापरासाठी शरीरात साठवून ठेवले जाते. याचा अर्थ आपल्याला दररोज एखाद्या विटामिन्सची गरज लागत नाही.
दिवसाला 1.5 mg ( 1,500 µg) विटामिन्स ए शरीरात गेल्यास अनेक वर्षांनी तुमच्या हाडांवर याचा वाईट परीणाम होण्याची शक्यता असते.तुम्ही म्हातारे झाल्यावर हाडे फॅक्चर होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.विशेषत: महिलांची हाडे उतार वयात ठिसुळ बनतात. त्यांनी जादा विटीमिन्स ए घेऊ नये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर तुम्ही आठवड्यातून अनेकदा लिव्हर खाले तर तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात विटामिन्स ए वाढू शकते. फिश लिव्हर ऑईलमध्येही ते भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही बाहेरुन सप्लिमेंट म्हणून विटामिन्स A घेत असाल तर दररोज 1.5 mg च्या वर घेऊ नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जर तुम्ही मासांतील लिव्हर आठवड्यातून एकदा खात असाल तर विटामिन्सची A ची सप्लिमेंट घेऊ नका.चीझ, अंडी, मासे, दूध आणि योगर्ट यातून विटामिन्स ए भरपूर मिळते. पिवळ्या, लाल आणि हिरव्या पानांच्या पालेभाज्या आणि फळे, पालक, गाजर, रताळे यात विटामिन्स ए भरपूर असते. पिवळी फळे, आंबा, पपई आणि जर्दाळू या फळात विटामिन्स A भरपूर असते.