मुंबई | 4 डिसेंबर 2023 : हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत असते. तुमच्या हाडांना मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डीची खूप गरज असते. शरीरात याच्या कमतरतेने कॅल्शियमचे अब्जॉर्शन चांगल्या पद्धतीने होत नाही त्यामुळे हाडे कमजोर होतात. हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता होण्याची जादा शक्यता असते. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर चला पाहूयात शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरुन काढायची ते पाहूयात..
व्हिटॅमिन-डी आपल्या हाडांसाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्यांची वाढ खुंटणे आणि हाडे कमजोर होण्यासारखे आजार होतात. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव होतो. आर्थरायटिसच्या रुग्णांसाठी देखील व्हिटॅमिन डी गरजेचे असते. त्याच्या अभावी संधीवातात हाडे कमजोर होऊन सांधे दुखू लागतात.
व्हिटॅमिन-डी ला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हटले जाते. कारण याचा सर्वाधित स्रोत सूर्यप्रकाश आहे. याच्या कमतरतेने मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतात. डिप्रेशन येऊ शकते. आपले हृदय चांगले राखण्यासाठी देखील हे गरजेचे आहे. हिवाळ्यात ऊन कमी असते. थंडीपासून वाचण्यासाठी आपण घरातून बाहेर पडत नाही. तसेच सन प्रोटेक्शनच्या नादा आपण निसर्गातून मोफत मिळणाऱ्या या व्हिटॅमिन – डीला पारखे होत असतो. तर पाहू यात व्हिटॅमिन डीची गरज कशी भागवावी…
रोज थोडावर सुर्यप्रकाशात फिरावे त्यामुळे शरीरासाठी व्हिटॅमिन डी सहज मिळेल. सुर्याचा थेट प्रकाश शरीरावर पडल्याने व्हिटॅमिन डी तयार होते. त्यामुळे थोडावेळ ऊन्हात बसावे. यासंदर्भात योग्य सल्ला तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता.
तुम्ही सकस आहार घ्यायला हवा, तसेच सी फूडमध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन असते. टूना ( कुपा ) , सालमन ( रावस ) आणि मॅकरल ( बांगडा ) या माशांमध्ये डी व्हिटॅमिनचा भरपूर असते. यांचा आपल्या आहारात समावेश केल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढता येते.
फोर्टिफाईड फूड म्हणजे त्यात पोषकतत्वांना स्वतंत्रपणे टाकून विकले जाते. काही फूड आयटम्समध्ये व्हिटॅमिन डी टाकून विक्री केली जाते, जसे दूध, दही, सीरल्स, ज्यूस आदी. आपल्या आहारात याचा वापर केल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.
मशरुम खाण्याने देखील व्हिटॅमिन – डी ची कमी भरुन काढता येते. त्यामुळे आपल्या आहारात मशरुमचा वापर अधिकाअधिक करावा. त्यामुळे आरोग्यात लागलीच सुधारणा होण्यास मदत होईल.
( लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य आणि अधिक माहितीसाठी आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )