नवी दिल्ली : निरोगी शरीर हवे असेल तर व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक व संतुलित आहार (nutritional diet) घेणे आवश्यक आहे. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वे आढळतात. याच आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे कॅल्शिअम (calcium). मुलांच्या शारीरिक विकासात कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील हाडे कमकुवत (weak bones) होऊ लागतात. तसेच सांधेही दुखू लागतात. शरीरात कॅल्शिअमची कमतरता असल्यास कोणकोणती लक्षणे दिसतात, ते जाणून घेऊया.
– स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे हेही शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षण आहे. त्यामुळे स्नायू दुखू लागतात. कधी ही वेदना सुसह्य असते तर कधी खूप वेदनादायक असते. शरीरात पाण्याची कमतरता असतानाही क्रॅम्प्सची समस्या उद्भवू शकते.
– एखादा निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडत असेल किंवा तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असेल, तर तीही कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षणे असू शकतात.
– मतिभ्रम होण्याची समस्या हे देखील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. जर तुम्हालाही भ्रमाची समस्या असेल, तर तुमच्याही शरीरात कॅल्शिअमची कमतरता असू शकते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा पुरेसा समावेश करावा.
– आजकाल सांधेदुखीची वेदना सामान्य आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही या समस्येचा त्रास होतो. तसेच त्यामुळे तरुणांचेही हाल होत आहेत. वेळोवेळी तुमचेही सांधे दुखत असतील तर ते शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षण आहे.
– तुमची नखं लवकर तुटतात का ? त्याचे उत्तर हो असेल तर हेही कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते, हे समजून घ्या. यासाठी रोज दूध आणि दही यांचे सेवन घ्या. यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते.
– हात आणि पायांना मुंग्या येणे, हा त्रास देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. जर तुम्हालाही हात-पायांमध्ये मुंग्या येत असतील तर आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा नक्कीच समावेश करा.
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदय गतीमध्ये बदल देखील दिसून येतात. यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ताबडतोब योग्य उपचार करा.
– उन्हाळ्यात तुमची त्वचा कोरडी राहिली तर कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते. हिवाळ्यात कोरडी त्वचा सामान्य असते, पण उन्हाळ्यात कोरडी त्वचा असणे ही चिंतेची बाब असते. हे कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेदेखील देखील होते.
कशी करावी कॅल्शिअमची कमतरता पूर्ण ?
कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी दूध, दही, चीज, लोणी, ताक, अंडी, बदाम, तीळ, संत्री, बेरी, अंजीर, टोफू, अक्रोड इत्यादी पदार्थांचा तुमच्या आहारात नियमितपणे समावेश करा. या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात पुरेसा कॅल्शिअमचा पुरवठा होतो.