नवी दिल्ली – उत्तर भारतात घसरलेल्या तापमानामुळे थंडी (cold) शिगेला पोहोचली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उबदार कपड्यांचे थरावर थर (warm clothes)घालून घराबाहेर पडत आहेत. थंडी टाळण्यासाठी काही लोक रात्रीही उबदार कपडे घालून झोपतात. पण रात्री गरम कपडे घालून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक (wearing warm clothes while sleeping) ठरू शकते. रात्री गरम कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरण तर मंदावतेच पण त्वचेशी संबंधित आजारही होतात. रात्री स्वेटर घालून का झोपू नये, हे जाणून घेऊया.
त्वचेची समस्या उद्भवू शकते
रात्री झोपताना गरम कपडे घातल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्री गरम कपडे अथवा स्वेटर घालून झोपल्याने शरीरातील ओलावा कमी होतो, त्यामुळे तुम्हाला एक्झिमा किंवा खाज सुटणे असा त्रास सहन करावा लागू शकतो. त्याव्यतिरिक्त रात्री मोजे घालून झोपल्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनही होऊ शकते.
ब्लड प्रेशर वाढते
रात्री स्वेटर किंवा अन्य उबदार कपडे घालून झोपल्याने रक्तदाबही वाढतो. रात्रीच्या वेळी स्वेटर किंवा उबदार कपड्यांमुळे घाम येऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. अशा परिस्थितीत रात्री साधे कपडे घालून झोपण्याचा सल्ला दिला जातो.
हवा खेळती रहात नाही
थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण सहसा स्वेटर किंवा उबदार कपडे वापरतो. कधी कधी अती थंडीमुळे काही लोक रात्रीच्या वेळीही स्वेटर घालून झोपतात, पण स्वेटरमुळे शरीरातील हवेचा दाब कमी होतो, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. जर आपण जास्त वेळ स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपलो तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
इतर गरम कपड्यांमुळेही होते नुकसान
थंडी टाळण्यासाठी रात्रीही स्वेटर घालूनच झोपल्याने उबदार कपड्यांचे तंतूही कमजोर होतात. तंतूंच्या कमकुवतपणामुळे कपड्यांचा टिकाऊपणा कमी होतो. रात्रीच्या वेळी थंडी टाळण्यासाठी ब्लँकेट किंवा रजाई वापरणे चांगले. तरीही तुम्हाला उबदार कपडे घालून झोपायचे असेल तर झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉयश्चरायझर लावावे आणि हलका स्वेटर घालून झोपा.