जर महिनाभर चपाती खाल्लीच नाही तर? शरिरावर असा काय परिणाम होईल?

| Updated on: Nov 23, 2024 | 3:43 PM

समजा काही दिवस म्हणजे अगदी महिनाभर गव्हाचे पीठ जर खाल्ले नाही तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात किंवा काय फायदे मिळू शकतात याचा विचार कधी केला आहे का आपण?

जर महिनाभर चपाती खाल्लीच नाही तर? शरिरावर असा काय परिणाम होईल?
Follow us on

बाहेर कितीही खाल्ल तरी आपल्याला आठवण येते ती घरच्या जेवणाची. त्यात पोळी- भाजी तर आवर्जून आवडीची. तसे तर भारतासह जगभरात गव्हाच्या पिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का की हे पीठ तसं आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनातर गव्हाचे पीठ म्हणजे खाण्यास सक्त मनाई केली जाते. हे पीठ आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

समजा काही दिवस म्हणजे अगदी महिनाभर गव्हाचे पीठ जर खाल्ले नाही तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात किंवा काय फायदे मिळू शकतात याचा विचार कधी केला आहे का? चला मग जाणून घेऊयात.

चपाती प्रमाणात खाणे योग्य

गव्हाच्या पिठात भरपूर कॅलेरीज, फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी असते,मिनरलस् असतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकता. जर तुम्ही महिनाभर गव्हाचे पीठ खाल्ले नाही तर तुमचे वजन कमी होऊ शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आहारातून गव्हाचे पीठ पूर्णपणे काढून टाकणे योग्य आहे.

अनेकदा लोक गव्हापासून दूर राहतात ज्यांचा उद्देश पोट आणि कंबरेची चरबी कमी करणे असतो. पण चपाती मुख्यता: कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. जो शरीराला ऊर्जा पुरवतो. चपाती न खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जेची कमतकता भासू शकते.

जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अशा लोकांसाठी चपाती खाणे धोकादायक आहे. ज्या लोकांच्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते त्यांनी चपात्या खाणे टाळले आहे. गव्हाच्या चपातीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच आपण दिवसातून अनेक वेळा चपाती खातो. जर या घटकाची मात्रा आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

चपातीला पूर्णपणे आहारातून काढणे चुकीचे

तसेच गव्हामध्ये कार्ब्स असतात. गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचन मंदावते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अपचन असे त्रास होऊ शकतात. कारण चपाती पचायल थोडीशी जड असते. पण कमी प्रमाणात गहू खाल्ले तर पचनप्रक्रिया सुरळीत काम करते. गव्हात फायबर मुबलक प्रमाणात असतं, पचनसंस्था चांगले काम करते. जर चपाती अगदीच प्रमाणात खाल्ली तर बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होऊ शकतो. त्यामुळे पूर्णपणे गहू टाळल्याने बी जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते.

शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी चांगले?

असं म्हणतात की शिळी चपाती खाणे फायदेशीर ठरते पण एखाद्या व्यक्तीचे शरीर कोणत्याही प्रकारचे अन्न पचवू शकत असेल तरच अशा व्यक्तीने शिळी चपाती खाणे फायदेशीर ठरेल. पण ज्यांची पचनसंस्था कमजोर असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अन्न लवकर पचत नसेल तर त्याने रात्रीचे उरलेले अन्न पदार्थ खाऊ नये.

जर महिनाभर चपाती नाही खाल्ली तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गहू हे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे धान्य म्हणून ओळखले जाते. तुमच्या आहारातून गहू काढून टाकल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. तसेच तुम्हाला जर चपाती पचतच नसेल तर चपात्यांऐवजी तुम्ही गव्हाची लापशी खाऊ शकता.

पूर्णपणे चपातीला आहारातून वगळणे चुकीचे

एकंदरीत आपल्या आहारातून गव्हाला किंवा चपातीला पूर्णपणे काढून टाकणे अतिशय चुकीचे आहे. तुम्ही प्रमाणात चपातीचे सेवन केलं तर त्यामुळे शरिराला फायदाच होईल. कारण समजा तुम्ही महिनाभर गव्हाचे पीठ खाल्ले नाहीत तर तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

चपातीमध्ये फायबर असते जे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत करते, तथापि, आपल्या आरोग्यासाठी किती चपाती योग्य आहेत मात्र त्याचे प्रमाण निश्चितच प्रमाणात खावे. आणि मुख्य म्हणजे हे गहू किंवा चपाती महिनाभर सोडून देने चुकीचे आहे.

(ही एक माहिती आहे. आम्ही याची पुष्टी केली नाही. )