मुंबई : जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर मॉर्निंग वॉक करणं खूप गरजेचं आहे. त्यात बहुतेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉकला जातात. मग वृद्ध लोकांपासून ते तरुणाईपर्यंत प्रत्येकजण रोज मॉर्निंग वॉकला आवर्जून जातो. तसंच मॉर्निंग वॉकमुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, ऑक्सिजनची पातळी बरोबर राहते तसेच अनेक आजारांपासून देखील आपण दूर राहतो. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. पण मॉर्निंग वॉक नंतर काय करावे असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. त्यामुळे मॉर्निंग वॉक नंतर पहिलं काय केलं पाहिजे याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक करून घरी येता तेव्हा तुमचे स्नायू दुखतात. तसेच तुमचे स्नायू उबदार देखील असू शकतात. तर अशावेळी स्ट्रेचिंग करणं गरजेचं असतं. स्ट्रेचिंग केल्यामुळे स्नायू दुखणे कमी होते. तसेच स्नायूंची लवचिकता देखील सुधारण्यास मदत होते. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर लगेच बसू नका स्ट्रेचिंग करा.
मॉर्निंग वॉक वरून आल्यानंतर भूक लागते. त्यात शरीराला ऊर्जा मिळणे देखील गरजेचं असतं. तर मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर केळी खाणं गरजेचं असतं किंवा प्रोटीन शेक देखील तुम्ही घेऊ शकता. केळी तुमच्या स्नायूसाठी खूप फायदेशीर ठरते तसेच प्रोटीन शेक देखील तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे मॉर्निंग वॉक वरून आल्यानंतर केळी किंवा प्रोटीन शेक तुम्ही आवर्जून घ्या.
मॉर्निंग वॉक वरून आल्यानंतर आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण झालेली असते. तसेच मॉर्निंग वॉक नंतर आपल्या शरीराला चालना मिळणे देखील गरजेचं असतं. तर अशावेळी आपल्या शरीराला थंडावा देणे देखील गरजेचे असतं. शरीराला थंडावा मिळाल्यामुळे आपल्या हृदयाची गती हळूहळू कमी करण्यास मदत होत. तसेच स्नायू दुखी देखील कमी होते. त्यामुळे मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर सर्वात प्रथम शांत बसा. प्रत्येकाने मॉर्निंग वॉक नंतर दहा मिनिटे शांत बसणे गरजेचे आहे.