50 व्या वर्षीही फिट आहे शिल्पा शेट्टी, जाणून घ्या तिचा डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलच रहस्य

| Updated on: Dec 05, 2024 | 2:30 PM

शिल्पा डायटिंगऐवजी हेल्दी खाण्यावर भर देते, ज्यामुळे ती फिट राहते.

50 व्या वर्षीही फिट आहे शिल्पा शेट्टी, जाणून घ्या तिचा डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलच रहस्य
शिल्पा शेट्टी
Follow us on

शिल्पा शेट्टी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तिची कामाबद्दलची ऊर्जा आणि तंदुरुस्ती बघून तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिल्पा शेट्टी हिचा नियमित घेत असलेला निरोगी आहार आणि व्यायाम हे तिच्या फिटनेसचे मोठे रहस्य आहे. जाणून घेऊया त्याच्या डाएट आणि फिटनेस टिप्सबद्दल.

शिल्पा शेट्टी चा डाएट प्लॅन

शिल्पा शेट्टी ही तिच्या संतुलित आणि निरोगी आहारावर नेहमी भर देते. डाएटिंग करण्यापेक्षा ती पौष्टिक आहार घेणे पसंत करते. तसेच शिल्पा शेट्टीच्या आहारात प्रथिने आणि हेल्दी कार्बने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश असतो.

हे सुद्धा वाचा

1. हेल्दी कार्ब आणि प्रथिनांचे महत्त्व

शिल्पाच्या डाएटमध्ये ब्राऊन राईस, होलग्रेन ब्रेड आणि प्रोसेस्ड न केलेला पास्ता यांचा समावेश असतो.

त्यात प्रथिनांबद्दल बोलायचे झाले तर ती चिकन, मासे आणि डाळी यासारख्या प्रथिनांचे सेवन करत असते.

२. ज्वारीच्या पोळीचे सेवन

शिल्पा शेट्टी तिच्या आहारात गव्हाची पोळी न खाता ज्वारीची भाकरीचा जास्त प्रमाणात आहारात घेत असते.

दरम्यान ज्वारीच्या पिठात आहारातील फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

३. खाण्यावर नियंत्रण

शिल्पा दिवसातून ५-६ वेळा कमी प्रमाणात जेवण करते. यामुळे त्यांचे चयापचय वाढते आणि एनर्जी लेव्हलही टिकून राहते.

हायड्रेशनचे महत्त्व

शिल्पा शेट्टी नेहमी स्वतःच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. त्याबरोबर नारळाचे पाणी आणि ताज्या भाज्यांचा रस देखील सेवन करते, ज्यामुळे तिचे शरीर डिटॉक्स होते आणि तिची त्वचा चमकदार होते.

हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन

शिल्पा शेट्टी तिच्या आहारात नेहमी हंगामी फळे आणि भाज्यांना विशेष महत्त्व देते. हंगामी फळ भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात.

अल्कोहोलपासून लांब

फिटनेससाठी शिल्पा अल्कोहोलपासूनही अंतर ठेवते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि डिहायड्रेशनची समस्या ही उद्भवत नाही.