Health : आजारी पडण्याआधी तुमच्या ओठांवर दिसतात लक्षणे…जाणून घ्या!

| Updated on: Sep 30, 2023 | 10:28 PM

ओठांचे रंग आपल्या शरीरातील अनेक गोष्टी दर्शवत असतात. तर आता आपण ओठांचे रंग कोणकोणत्या समस्या दर्शवतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : आजारी पडण्याआधी तुमच्या ओठांवर दिसतात लक्षणे...जाणून घ्या!
Follow us on

मुंबई : जेव्हाही आपल्याला कोणताही आजार होत असतो तेव्हा त्याची लक्षणे अगोदरच दिसू लागतात. त्यामुळे आपल्याला त्यावर योग्य तो उपचार घेणं सोप्प जातं. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या ओठाचे रंग आपल्या शरीरातील समस्यांबाबत संकेत देत असतात. बहुतेक लोकांचे ओठ लहानपणी गुलाबी असतात जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे बहुतेक लोकांचे ओठ लाल, काळे किंवा पांढरे अशा रंगांमध्ये बदलतात. पण हेच ओठांचे रंग आपल्या शरीरातील अनेक गोष्टी दर्शवत असतात. तर आता आपण ओठांचे रंग कोणकोणत्या समस्या दर्शवतात याबाबत जाणून घेणार आहोत.

अनेक लोकांच्या ओठांचा रंग जांभळा होतो. याचं कारण म्हणजे जास्त थंडीमुळे किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही आजारामुळे आपल्या ओठांचा रंग जांभळा दिसू लागतो. तसेच तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर ओठांचा रंग जांभळा दिसतो.

तुमच्या ओठांचा रंग जर पांढरा किंवा पिवळा दिसत असेल तर ते अनेक समस्या दर्शवते. जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल किंवा तुमच्या शरीरात रक्त कमी असेल तर तुमचे ओठ पांढरे दिसतात. तर व्हायरल इन्फेक्शनमुळे तुमचे ओठ पिवळसर दिसू लागतात.

जर तुम्हाला लिव्हरशी संबंधित काही आजार असतील तर तुमचे ओठ लाल दिसू लागतात. तुमचे लिव्हर कमजोर झाले तर तुमच्या ओठांचा रंग लाल दिसतो. तसंच बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असते तर ॲलर्जीमुळे देखील ओठांचा रंग लाल दिसू लागतो.