हिवाळा आपल्यासोबत केवळ थंडी नाही तर बरेच काही घेऊन येतो. या ऋतूत अनेक आजारांचा धोका वाढतो. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना जास्त धोका असतो. तापमानात घट झाल्याने प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे शरीरातील कोणत्याही बॅक्टेरिया आणि व्हायरसवर हल्ला करणे सोपे होते. या ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. यामुळे आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या व्हिटॅमिन D ची पातळी कमी होऊ शकते.
सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. अजय अग्रवाल सांगतात की, या ऋतूमध्ये जर एखाद्या व्यक्तीला ताप, थंडी, अंगदुखी, थकवा आणि श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यांना हलक्यात घेऊ नये आणि त्वरित उपचार करावेत.
डॉ. अजय सांगतात की, या ऋतूत न्यूमोनिया, रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा धोका जास्त असतो.
कोणत्या लोकांना जास्त धोका?
डॉ. अजय सांगतात की, या ऋतूत श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, जसे की वृद्ध आणि लहान मुलांना जास्त धोका असतो. अशा वेळी या लोकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
या ऋतूत सकाळ-संध्याकाळ बाहेर जाणे टाळावे. डोके आणि शरीर झाकून ठेवा. प्रदूषण जास्त असेल तर मास्क घालून बाहेर पडा. खानपानाची काळजी घ्या. शरीर हायड्रेटेड ठेवा आणि फास्ट फूड खाणे टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर व्यायाम करू नका आणि काही लक्षणे असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
डॉ. अजय सांगतात की, या ऋतूत होणारे बहुतेक आजार बॅक्टेरियामुळे होतात. फुफ्फुसात इन्फेक्शन होते. वेळीच उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो. या आजारांमुळे तीव्र ताप, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत खोकला अशी काही गंभीर लक्षणे देखील उद्भवतात. आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. उशीर केल्यास हे आजार प्राणघातक ठरू शकतात.
लक्ष्यात घ्या की, हिवळ्यात एखाद्या व्यक्तीला ताप, थंडी, अंगदुखी, थकवा आणि श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यांना हलक्यात घेऊ नये आणि त्वरित उपचार करावेत.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)