सॅनिटरी पॅडबाबतीत (Sanitary Pad) आता मोठ्याप्रमाणात जनजागृती झाली आहे. सॅनिटरी पॅडला उत्तम आणि सोयीस्कर असा एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप (menstrual cup). हा कप वापरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस त्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नसते. पाळी (Periods) म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा अनेक समस्येतून महिला जात असतात. त्यातच कपड्यामुळे ओलेपणा, डाग पडण्याची भीती असते. यामुळे स्त्रीला सतत एक एन्झायटी असते. डिस्पोजेबल पॅड (Disposable Pad) रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढतात. पॅडला दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुगंधी रसायनांमुळे अपाय होण्याची शक्यता असते. तर आज आपण मेन्स्ट्रुअल कपबद्दल जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हालाही तुमच्या मासिक पाळी चांगल्या प्रकारे कसे हाताळायचे हे कळेल.
प्रथम मेन्स्ट्रुअल कप सी-आकारात फोल्ड करावा, नंतर योनीमध्ये घाला. ते लावताच योनीच्या बाहेरील थरात घट्ट बसते. म्हणजेच ते योनी पूर्णपणे सील करेल. ते लावल्यानंतर, आपल्या हाताने हलके फिरवण्याचा प्रयत्न करा. जर ते योग्य प्रकारे बसविल्या गेले असेल तर ते सहजपणे हलते. एकदा लागू केल्यानंतर फ्लो कितीही असला तरी 12 तास बदलण्याची गरज नाही.
सॅनिटरी नॅपकिन्स वारंवार सेट करावे लागतात, परंतु मेन्स्ट्रुअल कपला नाही. मेन्स्ट्रुअल कप रक्त बाहेर येण्यापूर्वी आत शोषतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पन्समधील रक्त योनीभोवती बराच काळ राहते. पण कपिंग केल्यावर तसे होत नाही. त्यात रक्त जमा होत राहते. ज्यामुळे स्त्रियांना टॉक्सिक शॉक सिंड्रोम कधीच होऊ शकत नाही. TSS हा एक दुर्मिळ जिवाणूजन्य रोग आहे जो ओले नॅपकिन्स आणि टॅम्पन्स दीर्घकाळ वापरल्याने होतो.
(मेन्स्ट्रुअल कप वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)